Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर

अनंत चतुर्दशी निमित्त रोहा शहरातील विविध गणेश मूर्तींचे विसर्जन संपन्न रोहा ( शैलेश गावंड) दिनांक २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी निमित्त दहा दिवसाच्या गणपतीचे ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून विसर्जन झाले यामध्ये रोहा चा मानाचा गणपती म्हणजे एक गाव एक गणपती म्हणून परिचित असलेला सार्वजनिक गणेशोत्सवाचा भाटे वाचनालयातील गणपती तसेच जय गणेश मित्र मंडळाचा भुवनेश्वर चा राजा आणि इतर अनेक गणेश मूर्तींचे जल्लोषमय वातावरणात विसर्जन झाले रोहेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून बाप्पा ला निरोप दिला

Read More

सुर्वे परीवाराच्या गणपती विसर्जन मिरवणूकीत महाकाल अवतार समुहाचे चलचित्र दृश्याने मुरुडकर भारावले ! प्रतिनिधी /कोर्लई,ता.२६(राजीव नेवासेकर) सर्वत्र दहा दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.यामध्ये गौरी गणपती सणात आपल्या उपजत कलेला जोपासत वयाच्या ८७ व्या वर्षी सुमारे सहा फूट उंचीचे पर्यावरणपूरक शाडूच्या मातीचे मूर्तीचे चलचित्र स्वतः हाती काढून ५१ वर्षांची परंपरा जपणारे बबन सुर्वे उर्फ फुटाणकर यांच्या गणपती मुर्ती विसर्जन मिरवणूकीतील पुण्याहून आलेल्या महाकाल अवतार समुहाचे चलचित्र दृश्य सादरीकरणाने मुरुडकर अक्षरशः भारावले ! मुळात,ते भंडारी समाजातील सुर्वे कुटुंबात जन्मलेले; परंतु बबन फुटाणकर या नावाने सर्व पंचक्रोशीत प्रचलित आहेत. बालपणी मुरुडमध्ये भट्टीत भाजलेल्या चणे फुटण्याचे एकमेव दुकान होते. त्यावरुन मुरुड पंचक्रोशीत फुटाणकर…

Read More

रायगड जिल्हा आंतरशालेय हँडबॉल स्पर्धेत ग्रेगोरियन स्कूल चा दबदबा अंडर-१७ मुलांच्या संघाचे विजेतेपद; मुंबई विभागीय स्पर्धेसाठी निवड रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) MDN International School, कोलाड येथे आयोजित रायगड जिल्हा आंतरशालेय हँडबॉल स्पर्धेत ग्रेगोरियन पब्लिक स्कूल, रोहा यांच्या अंडर-१७ मुलांच्या संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अर्णव सलागरे यांच्या नेतृत्वाखाली संघाने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. खेळाडूंच्या या यशामागे प्रशिक्षक श्री. सुधीर जंगम यांचे मार्गदर्शन आणि खेळाडूंची मेहनत महत्त्वाची ठरली. या विजयानंतर ग्रेगोरियन पब्लिक स्कूलच्या संघाची २९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या विभागीय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड झाली असून, या स्पर्धेत संघ रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या…

Read More

रोहा तालुक्यात भक्तिभावपूर्ण वातावरणात गणेशोत्सवाची सांगता ढोल-ताशांचा गजर, लेझीम-कोळी नृत्याची रंगत; ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात बाप्पाला भावपूर्ण निरोप रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) रोहा तालुक्यात गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावाने, उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात झाली. रोहा शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये गणरायाच्या विसर्जन मिरवणुका पारंपरिक तसेच सांस्कृतिक पद्धतीने काढण्यात आल्या. ढोल-ताशांचा गजर, सनईचे मंगल सूर, फुलांची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. विसर्जनापूर्वी भाविकांनी गणरायाची विधिवत पूजा-अर्चा व आरती केली. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. रोहा शहरातील गणेशमूर्तींचे कुंडलिका नदी, पकटी तसेच अष्टमी-करांनी नदी…

Read More

संभे गावात आजही सार्व.उत्सव काळात जोपासला जातो सारिपाटचा खेळ, परंपरा कायम. कोलाड (श्याम लोखंडे ) पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व समजला जाणारा तसेच महाभारताशी जोडला गेलेला सारीपाट खेळाचा डाव आजही ग्रामीण भागात विशेषतः सार्व. उत्सव काळात खेळला जात आहे.आधुनिक काळात गणपती उत्सवातील अनेक पारंपारीक खेळ इंटरनेट मोबाईल युट्यूब इंस्टाग्रामध्ये लोप पावत असतांना दिसत आहेत. परंतु रोहा तालुक्यातील तसेच कुणबी समाज नेते माजी आमदार कै.पा.रा. सानप. यांच्या संभे गावात आजही या पारंपरिक खेळाची परंपरा पिढ्यानं पिढ्यापासून सुरु असणारा सारिपाटचा खेळ अजून ही टिकून ठेवला असल्याचे सार्व.उत्सव काळात दिसून येत आहे. हा खेळ गणेश उत्सवापासून नवरात्रौउत्सव दसऱ्या पर्यंत खेळाला जात असून कोजागिरी पौर्णिमेला…

Read More

खांब देवकान्हे विभागातील दहा दिवसांच्या गणपती बाप्पांना भक्तीमय वातावरणात निरोप. कोलाड (श्याम लोखंडे ) दहा दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जनाला पावसाची मोठी विश्रांती मिळाल्याने भक्तगण गणेश भक्तांनी बाप्पाचा जयजयकार करत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जय घोषात भक्तिमय वातावरणात खांब, देवकान्हे विभागातील अनंत चतुर्दशीच्या दहा दिवसांच्या सार्वजनिक आणि खासगी बाप्पांचे विसर्जन ढोल ताशे, खालू बाजा, तालावर वाजत गाजत व फटाक्यांच्या आतिषबाजीत तसेच हरिनामाच्या गजरात गुलालाची उधळण करत आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या भक्ती भावनेने निरोप दिला. परिसरातील तसेच खांब देवकान्हे विभागातील ग्रामीण भागातील नागरिकांनी गणपतीपूर्वीच वीसर्जन घाट व जाणारा मार्ग तसेच तलाव व नदी परिसर स्वच्छता करण्यात आली होती.…

Read More

डीएमसीसी स्पेशालिटी केमिकल्सला १०८ वर्षे पूर्ण; १०८ जणांचे रक्तदान! स्थापना दिनानिमित्त सामाजिक बांधिलकीचा अनोखा संकल्प; स्टाफ, कामगार व कंत्राटी कामगारांचा उत्स्फूर्त सहभाग रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) रोहे तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील डीएमसीसी स्पेशालिटी केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या १०८व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कंपनीच्या १०८ वर्षांच्या वाटचालीचे औचित्य साधत तब्बल १०८ रक्तदात्यांनी रक्तदान करून ‘१०८’चा अनोखा संकल्प पूर्ण केला. त्यामुळे यंदाचा स्थापना दिन सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमामुळे विशेष ठरला. कंपनीच्या वतीने गुरुवार, दि. २४ सप्टेंबर रोजी कंपनीच्या परिसरात जिल्हा शासकीय रक्त केंद्र, सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग-रायगड यांच्या सहकार्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात ५५ स्टाफ कर्मचारी, ३०…

Read More

वैज्ञानिक माहितीचा विविध विभागांनी प्रभावीपणे उपयोग करावा–जिल्हाधिकारी किशन जावळे केंद्रीय भूजल मंडळातर्फे अहवाल सादरीकरण व माहिती प्रसार कार्यशाळा संपन्न (प्रतिनिधी रायगड) रायगड अलिबाग, दि. २४ (जिमाका) : रायगड जिल्ह्यातील भूजल संसाधनांचे वैज्ञानिक पद्धतीने नियोजन, संवर्धन आणि शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी राष्ट्रीय जलधारक स्तर नकाशांकन व व्यवस्थापन कार्यक्रम (NAQUIM) अंतर्गत तयार करण्यात आलेल्या अहवालातील वैज्ञानिक माहितीचा विविध विभागांनी प्रभावीपणे उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. जिल्ह्यातील भूजल व्यवस्थापनासाठी हा अहवाल अत्यंत उपयुक्त असून, त्यातील निष्कर्षांचा विकासकामे व नियोजनात उपयोग करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे केंद्रीय भूजल मंडळ (CGWB) तर्फे राष्ट्रीय जलधारक स्तर नकाशांकन व…

Read More

रोह्यात रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी; ५० रक्तदात्यांचे उत्स्फूर्त योगदान रोटरी क्लब रोहा सेंट्रल व जय गणेश मित्र मंडळाचा संयुक्त उपक्रम रोहा प्रतिनिधी – संतोष सातपुते सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे, या उद्देशाने रोटरी क्लब रोहा सेंट्रल आणि जय गणेश मित्र मंडळ, भुवनेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा रक्तसंक्रमण केंद्र, रायगड यांच्या विशेष सहकार्याने बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ५० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कर्तव्याची जाणीव जपली. रक्तदान हेच श्रेष्ठदान मानले जाते. या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रक्तदात्यांनी रक्तदान करून…

Read More

रोहा तालुक्यात २९ सप्टेंबरला दोन ठिकाणी रोजगार मेळावे युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; रोशन चाफेकर यांचे आवाहन रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर आयोजित करण्यात येत असलेल्या रोजगार महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून २९ सप्टेंबर २०२६ रोजी रोहा तालुक्यात दोन ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून, स्थानिक युवक-युवतींसाठी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य व अनुभवाला अनुरूप रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश…

Read More