Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर

गणेशभक्तांच्या सेवेसाठी भाजपाचा सेवाभावी पुढाकार! रोह्यात मोफत मिनीडोअर बससेवेचा शुभारंभ; रविंद्र चव्हाणांकडून अमित घाग यांच्या उपक्रमाचे कौतुक रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) गणेशोत्सवासाठी मुंबईहून मोठ्या संख्येने आपल्या गावाकडे येणाऱ्या गणेशभक्तांचा पुढील प्रवास सुखकर व्हावा, यासाठी भाजपा रोहा तालुक्याच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी मोफत मिनीडोअर बससेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेला भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते गुरुवार, दि. १० सप्टेंबर रोजी अलिबाग येथे शुभारंभ करण्यात आला. यावेळी आ. रविंद्र चव्हाण यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना, जनतेच्या अडचणीच्या काळात प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे येणे हीच खरी लोकसेवा असल्याचे सांगितले. भाजपा रोहा तालुकाध्यक्ष अमित हरिभाऊ घाग यांनी पुढाकार घेत सलग दुसऱ्या…

Read More

*रोहा शहरात गणेशोत्सवानिमित्त भव्य स्वच्छता अभियान; ४२१ श्री सदस्यांच्या श्रमदानातून २७ टन कचरा संकलित* रोहा:समीर बामुगडे श्री गणेशोत्सवाचे औचित्य साधून ‘डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा’ यांच्या वतीने, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा अष्टमी नगरपालिका क्षेत्रात व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शुक्रवारी (दि. ११ सप्टेंबर २०२६) gसकाळी ८:०० ते ११:०० या वेळेत अवघ्या तीन तासांत श्री सदस्यांनी रोहा शहर आणि परिसराचा कायापालट केला. या मोहिमेअंतर्गत रोहा अष्टमी नगरपालिका क्षेत्रातील मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसर, शहरातील प्रमुख व उपरस्ते, तसेच रोह्याला जोडणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांची सखोल साफसफाई करण्यात आली. प्रतिष्ठानच्या शिस्तबद्ध नियोजन आणि सामाजिक…

Read More

दमखाडी नाल्याच्या दुरुस्तीला अद्याप मुहूर्त नाही! ३० जुलैच्या दुर्घटनेनंतरही काम रखडले; गणेशोत्सव तोंडावर, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर रोहा प्रतिनिधी – संतोष सातपुते रोहा शहरातील दमखाडी नाक्याजवळील जयराम अपार्टमेंट परिसरात ३० जुलै रोजी रात्री नाल्यावरील स्लॅब अचानक कोसळून तब्बल आठ वाहने नाल्यात कोसळल्याची धक्कादायक घटना घडली होती. या दुर्घटनेत अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले; मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मात्र, दुर्घटनेला बराच कालावधी उलटूनही नाल्याच्या दुरुस्तीच्या प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. घटनेनंतर रोहा नगराध्यक्षा वनश्री शेंडगे आणि मुख्याधिकारी अजयकुमार एडके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी…

Read More

रायगड जिल्ह्याची आपत्ती प्रतिसाद क्षमता बळकट करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनकडून बचाव नौका व आपत्कालीन साहित्याचे वितरण. रायगड/ प्रतिनिधी समुदाय सुरक्षा, आपत्ती पूर्वतयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या आपल्या बांधिलकीचा भाग म्हणून, रिलायन्स फाउंडेशनने कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत रायगड जिल्हा प्रशासनाला इंजिन बोटसह पूर बचाव नौका व अत्याधुनिक आपत्कालीन बचाव साहित्य प्रदान केले. या साहित्याचे वितरण रायगड पोलिसांतर्फे नुकत्याच पार पडलेल्या ‘जीवनदूत सन्मान सोहळा’ कार्यक्रमात आरसीएफ सभागृह, कुरुळ, अलिबाग येथे करण्यात आले. या कार्यक्रमास पालकमंत्री भरतशेठ गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा सह पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, अलिबाग…

Read More

*द.ग.तटकरे महाविद्यालयाचे वादविवादात मुंबई विद्यापीठात सुवर्ण यश.महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा रोवला तुरा *ध्रुव राऊत ठरला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट वक्ता प्रतिनिधी  -किशोर पितळे- मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवांतर्गत आयोजित मराठी वादविवाद स्पर्धेच्या अंतिम फेरीत तळा येथील द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन करत सांघिक सुवर्णपदक (गोल्ड मेडल) पटकावले. याच स्पर्धेत महाविद्यालयाचा विद्यार्थी ध्रुव राऊत याने मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट वक्ता हा मानाचा पुरस्कार मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.मुंबई विद्यापीठ विद्यार्थी भवन, चर्चगेट येथे नुकतीच या स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. मुंबई विद्यापीठाच्या १२ विभागांमधून निवड झालेल्या ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी या मानाच्या वादविवाद स्पर्धेत सहभाग…

Read More

तळा शिवसेना तालुका प्रमुख प्रद्युम्नजी ठसाळ यांची फेर निवडीने शिवसैनिकात चैतन्य. प्रतिनिधी तळा/ किशोर पितळे शिवसेना मध्यवर्ती कार्यालया कडून प्रभारी तालुका प्रमुख नितीन साळवी यांची नियुक्ती पुढील आदेशा पर्यत स्थगिती देण्यातआल्याचे सचिव संजय मोरे यांच्या सहिने पत्र दिले आहे.त्याचा जागीतळा शिवसेना तालुका प्रमुख पदी प्रद्युम्नजी ठसाळ याची फेरनिवड झाल्याने शिवसैनिकांत चैतन्य निर्माण झाले आहे.यापुर्वी नितीन साळवी यांचीप्रभारी तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या अचानक नियुक्तीने शिवसैनिकात संभ्रम निर्माण झाल्याने शिवसेनेत नक्की चाललंय तरी काय असे वातावरण निर्माण झाले आगामी नगरपंचायत निवडणूक व ग्रामपंचायत निवडणूका उभ्या ठाकल्याने साळवी यांची नियुक्ती का करण्यात आली असा संभ्रम संपूर्ण तालुक्यात निर्माण झाला…

Read More

समाजसेवेच्या कार्याचा शिर्डीत गौरव; डॉ. फरीद चिमावकर यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गौरव’ सामाजिक, वैद्यकीय व ग्राहक सेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची राज्यस्तरावर दखल; रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा प्रतिनिधी (संतोष सातपुते) रोहा तालुक्यात सामाजिक, वैद्यकीय आणि ग्राहक सेवा क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे डॉ. फरीद चिमावकर यांच्या समाजोपयोगी कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष पुरस्कार सोहळ्यात **‘बी द चेंज फाउंडेशन’**च्या वतीने डॉ. चिमावकर यांना मानाचा राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या सन्मानामुळे रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. शिर्डीच्या पावन भूमीत झालेल्या या गौरव सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध…

Read More

निडी येथील पंकज मढवी यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली वीज वितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून हळहळ; कुटुंबीयांना मदतीसाठी प्रयत्न रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) रोहा वीज वितरण कंपनीत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असलेला निडी येथील ३१ वर्षीय होतकरू तरुण पंकज मढवी याची मुंबई येथे सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली. विजेचा जबरदस्त धक्का लागून गंभीररीत्या भाजलेल्या पंकजवर गेल्या पाच-सहा दिवसांपासून मुंबई येथे उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेने रोहा वीज वितरण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. महावितरणच्या देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू असताना विद्युत पोलावर चढलेला असताना पंकजला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत तो…

Read More

अपघातग्रस्तांसाठी धावणारा रोह्याचा ‘देवदूत’; बिलाल मोरबेकर यांचा ‘जीवनदूत’ पुरस्काराने गौरव रायगड पोलीस दलाचा रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सन्मान; निःस्वार्थी सेवेला पालकमंत्री भरत गोगावले यांची दाद रोहा प्रतिनिधी – संतोष सातपुते रोहा तालुक्यात कुठेही रस्ता अपघात घडला की शासकीय यंत्रणा पोहोचण्यापूर्वी जखमींच्या मदतीसाठी धावून जाणारे रोह्याचे सामाजिक कार्यकर्ते बिलाल मोरबेकर यांच्या निःस्वार्थी सेवेला रायगड पोलीस दलाने सलाम केला आहे. रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या ‘जीवनदूत’ सन्मान सोहळ्यात बिलाल मोरबेकर यांना विशेष ‘जीवनदूत’ पुरस्काराने गौरविण्यात आले. कुरूळ येथील आर.सी.एफ. सभागृहात आयोजित या सोहळ्यात रायगडचे पालकमंत्री तथा रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य…

Read More

तळा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा; उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांचे चिरंजीव अथर्व बनले ‘एम.डी. डॉक्टर तळ्याच्या शैक्षणिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद; जन्मभूमीतच रुग्णसेवा करण्याचा डॉ. अथर्व यांचा संकल्प प्रतिनिधी / तळा तळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांचे चिरंजीव अथर्व चंद्रकांत रोडे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च मानली जाणारी ‘एम.डी. मेडिसिन’ (M.D. Medicine) ही पदवी परीक्षा अत्यंत प्रतिष्ठेने उत्तीर्ण केली आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे तळा शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच एका स्थानिक तरुणाने ‘एम.डी.’ पदवी मिळवण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. या यशामुळे रोडे घराण्यासह संपूर्ण तळा तालुक्याचे नाव महाराष्ट्राच्या वैद्यकीय नकाशावर उज्वल झाले आहे. डॉ. अथर्व हे लहानपणापासूनच अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्यांचे प्राथमिक व…

Read More