*GCC-TBC २०२७ प्रवेश प्रक्रिया सुरू; विद्यार्थी व पालकांनी सावध राहावे* रोहा, प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मान्यतेने घेण्यात येणाऱ्या शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र (GCC-TBC) २०२७ परीक्षेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेश घेऊन परीक्षा अर्ज (Exam Form) दिलेल्या वेळेत भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. उशीर झाल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. परीक्षेचा अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांना LMS वर मोफत सरावाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून, मोबाईल Attendance बंधनकारक राहणार आहे. सध्या महाराष्ट्रातील विविध शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अनेक भरती प्रक्रियांमध्ये GCC-TBC इंग्रजी ३०/४० शब्द प्रति मिनिट व मराठी ३० शब्द…
Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर
खुशबू ठाकरे प्रकरणात अखेर एफआयआर दाखल; खुशबू च्या वडिलांसह ग्राम संवर्धन सामाजिक संस्था आणि राजीव गांधी पंचायतराज संगठनच्या संघर्षाला यश. रोहा:समीर बामुगडे पेण तालुक्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या वरवणे येथील आदिवासी आश्रम शाळेतील खुशबू नामदेव ठाकरे हिच्या मृत्यूप्रकरणी अखेर पेण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१) अंतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध एफ.आय.आर दाखल करण्यात आल्याने खुशबू ठाकरे चे वडील नामदेव ठाकरे आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था व राजीव गांधी पंचायत राज संघटन या सामाजिक संघटनांच्या दीड वर्षांच्या संघर्षाला मोठे यश प्राप्त झाले आहे. या प्रकरणात पोलीस तपास करण्याची जबाबदारी पेण पोलिसांवर येऊन पडली आहे. दरम्यान ग्राम संवर्धन…
* तळे येथे नामदार नाना शंकरशेट १६१वी पुण्यस्मरण सोहळा उत्साहात; संस्कृत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व ज्येष्ठ समाजबांधवांचा सत्कार* तळा -किशोर पितळे श्री लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्ट, दैवज्ञ ब्राह्मण समाज, तळे यांच्या वतीने *मुंबईचे शिल्पकार नामदार नाना शंकरशेट यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध सामाजिक व गुणवंत विद्यार्थी गौरव सन्मान कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, दिनांक ३१/०७/२०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या प्रारंभी नामदार नाना शंकरशेट यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.उपस्थित मान्यवरांनी नानांच्या समाजोपयोगी, शैक्षणिक व संस्कृतप्रेमी कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेत त्यांना विनम्र अभिवादन केले.या कार्यक्रमाचे औचित्य साधून एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत संस्कृत विषयात विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना *”नामदार नाना शंकरशेट संस्कृत शिष्यवृत्ती” प्रदान…
कु.स्वरा प्रकाश गायकवाड “नामदार नाना शंकरशेट संस्कृत शिष्यवृत्ती”ने सन्मानित. प्रतिनिधी /किशोर पितळे भिमकन्या कु.स्वरा प्रकाश गायकवाड हिने एस्.एस्.सी माध्यमिक शालांत परीक्षेत संस्कृत भाषेत ८६%गुण प्राप्त केले असून दैवज्ञ ब्राह्मण समाज तळे तर्फे मुंबईचे आद्य शिल्पकार समाज भुषण कै.नामदार नाना शंकरशेठ यांच्या १६१व्या पुण्यस्मरण च्या निमित्ताने३१जुलै रोजी श्री लक्ष्मी नारायण मंदिरात सन्मानचिन्ह, गौरवपत्र व रोख रक्कम देऊन उपस्थितसमाज बांधवाच्या हस्ते गौरविण्यात आले. गो.म.वेदक विद्यामंदिर तळे येथे प्रथमच संस्कृत भाषा विषय सक्तीचा व ऐश्चिक करण्यात आला होता तरी देखील या भिम कन्येने संस्कृत विषयाची निवड करून ८६%गुण विशेष प्रविण्य प्राप्त केले.संस्कृत विषयावर लक्ष केंद्रित करून धेय्य साध्य केले आहे.हा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवला…
रोहा दमखाडी नाका नाल्यावरील जुना स्लॅब कोसळला; आठ वाहनांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली कोलाड (श्याम लोखंडे) रोहा शहरातील दमखाडी येथील रहदारीचा मार्ग आणि मेन चौकातील तसेच रोहा-कोलाड मार्गावरील नाल्यावरील सुमारे २५ ते ३० वर्षे जुना असलेला स्लॅब गुरुवारी रात्री अचानक पत्त्यासारखा कोसळल्याने घडलेल्या ये दुर्दैवी घटनेत आठ वाहनांचे नुकसान झाले असून या दुर्घटनेत वरती उभ्या करण्यात आलेल्या अनेक दुचाकी आणि रिक्षा नाल्यात कोसळल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर घटनेनंतर पोलिसांनी धाव घेत परिसर तातडीने बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली. तर सदरच्या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्षा वनश्री शेडगे, मुख्याधिकारी अजयकुमार एडके, उपनगराध्यक्ष, नगरसेवक व पालिका प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.…
रोहा सुपेगाव मार्ग सोमवारपासून खुला होण्याची शक्यता; कामात विलंब झाल्यास ठेकेदारावर कारवाईचा इशारा रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) गेल्या तीन आठवड्यांपासून बंद असलेल्या सुपेगाव मार्गावरील वाहतुकीचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, काम नियोजित वेळेत पूर्ण झाल्यास येत्या सोमवारपासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त सार्वजनिक बांधकाम विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे उपअभियंता अरुण पाटील यांनी दिली. ५ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मुरुड–रोहा–कोलाड प्रमुख मार्गावरील उसरोली फाटा ते तळेखार फाटा (कि.मी. ९ ते ११) या दरम्यान रस्त्याचा मोठा भाग खचला होता. त्यामुळे २० जुलैपासून हा मार्ग सर्व प्रकारच्या…
प्राथमिक शाळा तळेगाव येथे मोठ्या उत्साहात आदराने गुरुपौर्णिमा साजरी. तळा -किशोर पितळे गुरु ब्रम्हा गुरु विष्णु : गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरूवे नम ..मानवी जीवनात गुरुला अनन्य साधारण महत्व आहे.प्रथम गुरु ईश्वर (गर्भावस्थेतील)पहिला गुरु माता -पिता, दुसरा गुरू गुरुजंन,आपल्या घडवले ते गुरू,तिसरा गुरुलहानांपासून थोरांपर्यंत ज्यांच्या कडून शिकलो ते गुरू ,संत महंतांना पण गुरू करावा गुरु शिवाय ज्ञान नाही.आम्हांला पण गुरु करावा लागला म्हणूनच तुम्ही आमचे शिष्य झालात गुरु शिष्याचे नाते जीवनात टिकून ठेवले पाहिजे या गुरुच्या ऋणातून उतराई होण्याचा आणी कृतन्यता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून गुरूपौणीमा आषाढ पौर्णिमा अर्थात व्यासपुजा साजरी केली जाते.संस्कार संस्कृती जपली जावी…
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रोहा तालुका शिवसेनेचे समाजोपयोगी उपक्रम; रक्तदान शिबिर, शेतकऱ्यांना खत वाटप व गुणवंतांचा सत्कार रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ६६ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना रोहा तालुक्याच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिर, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना खत वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अशा उपक्रमांद्वारे समाजसेवेचा आदर्श निर्माण करण्यात आला. “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत रोठ बुद्रुक शिवसेना शाखेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला शिवसैनिक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल ५० रक्तदात्यांनी रक्तदान…
वराठी ठाकूरवाडी शाळेत शिव आधार फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) शिव आधार फाऊंडेशन, रोहा यांच्या वतीने रा. जि. प. शाळा वराठी ठाकूरवाडी येथे उसर ठाकूरवाडी, वराठी व बेलवाडी या तीन शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. तसेच प्रमुख पाहुणे श्री. रितेश जैन यांचे सुपुत्र हार्दिक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना दप्तर व खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उसर ठाकूरवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रमोद दिगंबर मोरे यांनी केले. प्रास्ताविकात श्री. सुरेश मोरे यांनी शिव आधार फाऊंडेशनच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. अध्यक्षीय भाषणात फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. नारायण खुळे यांनी श्री. रितेश जैन यांनी…
घरेलू कामगार संघाच्या वतीने कामगार मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न प्रतिनिधी /समीर बामुगडे रोहा दि. 26 : घरेलू कामगार संघ, संलग्न भारतीय मजदूर संघ, जिल्हा रायगड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कामगार मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. घरेलू कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात 85 घरेलू कामगार आणि 68 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमात घरेलू कामगारांच्या 68 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रोत्साहन देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, करिअरच्या संधी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सक्षम नागरिक घडविण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाच्या…

