रोहा लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहातअध्यक्षपदी ॲड मिलन शहा यांनी स्वीकारला पदभार. कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यात गेली पन्नासवर्षाहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, कला,क्रीडा,अशा विविध क्षेत्रात अलौकिक काम करत असणाऱ्या रोहा लायन्स क्लब रोहा च्या अध्यक्षपदी ॲड. मिलन शहा, तर सेक्रेटरीपदी संजय एकल, खजिनदार माया शहा, उपाध्यक्ष जयदेव पवार यांची निवड करण्यात आली. रोहा लायन्स क्लबचा ५३ वा पदग्रहण सोहळा रोहा येथील अक्षय लॉन निवी येथे लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल ३२३१ ए ४ चे जिल्हा प्रांतपाल एम जे एफ लायन प्रविण सरनाईक यांच्या उपस्थितीत मावळते अध्यक्ष लक्ष्मण शिट्यालकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला तर प्रसंगी यांच्याकडून…
Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा रोह्यात तिरंगा रॅलीतून जागर; दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत तसेच विद्यार्थ्यांच्या संघर्षातून मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी रोहा शहरात रविवारी तिरंगा रॅली उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवत, लोकशाही मूल्ये आणि संविधानिक अधिकारांच्या समर्थनाचा संदेश या रॅलीतून देण्यात आला. दमखाडी येथील नवरत्न हॉटेल परिसरातून रॅलीला प्रारंभ झाला. विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहभागींच्या हातात तिरंगा असून देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. रॅलीदरम्यान कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे किंवा पक्षीय घोषणा देण्यात आल्या नाहीत. विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा, संविधानिक मार्गाने झालेल्या संघर्षाचा आणि लोकशाही मूल्यांचा गौरव करण्यासाठी…
*मंडळ अधिकारी रविकांत जाधव यांच्या अटके विरोधात रायगड महसूल कर्मचाऱ्यांचा एल्गार; बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा- जिल्हाध्यक्ष भूषण विश्वासराव पाटील * प्रतिनिधी /तळा किशोर पितळे पेण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मंडळ अधिकारी रविकांत जाधव यांना करण्यात आलेल्या अटकेचा निषेध करत रायगड जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच रवीकांत जाधव यांच्यावरील कारवाईचा फेरविचार करावा, अन्यथा जिल्हाभर बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूषण विश्वास पाटील व सरचिटणीस प्रवीण वरंडे यांच्या स्वाक्षरीने सादर करण्यातआलेल्या निवेदनात दिला आहे. मंडळ अधिकारी रविकांत जाधव यांनी शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर फौजदारी गुन्हा…
“विठ्ठलनामाच्या गजरात न्हावे ग्रामस्थांची भक्तिमय दिंडी; टाळ-मृदुंगाच्या तालावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात उत्साहपूर्ण आगमन” प्रतिनिधी – सत्यप्रसाद आडाव चणेरा आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त न्हावे गावात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने ओतप्रोत भरलेला वारकरी सोहळा अनुभवायला मिळाला. ह.भ.प. अजय साळावकर यांच्या येथून निघालेल्या दिंडीने श्रीराम मंदिर, सोनखार येथून भक्तिमय वातावरणात प्रस्थान केले. या दिंडीत रा. जि. प. शाळा, न्हावे येथील शिक्षक, सर्व विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिंडी पुढे जात असताना ठिकाणआळी परिसरात वारकऱ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात, अभंग-भजनांच्या सुरावटीवर नाच-गाणी, फुगड्या खेळत भक्तिरसाचा अनोखा आविष्कार साकारला. विठ्ठलनामाच्या अखंड गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. “ज्ञानोबा-तुकाराम”, “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” अशा जयघोषांनी…
प्रति पंढरपुरात आषाढी एकादशीचा भक्तिमय सोहळा,अतिशय उत्साहात विठ्ठल-रखुमाईच्या नामघोषाने म्हसळा गवळवाडी दुमदुमली प्रतिनिधी /रवींद्र लाड म्हसळा:म्हसळा शहरातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गवळवाडी येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात सालाबादप्रमाणे आषाढी एकादशीचा पवित्र उत्सव अत्यंत भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.पहाटेपासून मंदिर परिसरात विठ्ठल नामाचा गजर,भजन-कीर्तन आणि वारकऱ्यांच्या दिंडीमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.या सोहळ्यात पीएमश्री राजीप प्राथमिक शाळा,म्हसळा क्रमांक १,न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा तसेच केशवराव खांबेटे सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने आकर्षक दिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी,शिक्षकांनी,पालकांनी आणि वारकरी भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत भजन,कीर्तन, नृत्यगीत सादर केले.त्यानंतर झालेल्या महाआरतीत सहभागी होत सर्वांनी विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केला.यावर्षी आषाढी एकादशी पूजेचा…
रस्त्यावर साचलेल्या पाण्यात विजेचा धक्का; दोन शाळकरी मुली थोडक्यात बचावल्या! जबाबदार कोण? प्रतिनिधी / गणेश पवार नेरळ येथील ममदापूर ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ विद्यामंदिर हायस्कूल परिसरात शुक्रवारी २४ जुलै सकाळी साडेसातच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. समर्थनगर येथील जहरा मेनशन सोसायटीत राहणाऱ्या दोन शाळकरी मुलींना शाळेत जात असताना पाटील सर यांच्या दुकाना शेजारील रस्त्याचे बाजूला असलेला विद्युत पोल व त्या ठिकाणी रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून जाताना अचानक विजेचा धक्का बसला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे दोन्ही विद्यार्थिनींचे प्राण वाचले. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, विजेचा धक्का बसल्यानंतर दोन्ही मुली तडफडू लागल्या. त्याचवेळी जवळील अभिषेक स्टेशनरीचे संचालक अभिषेक आणि तेथे उपस्थित असलेल्या…
कै. नारायण पांडुरंग गोरे गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांकडुन शैक्षणिक साहित्य व छत्री वाटप. प्रतिनिधी / रवींद्र लाड म्हहळा: दि. १८ जुलै रोजी कै. नारायण पांडुरंग गोरे गुरुजी यांच्या स्मरणार्थ तसेच स्मृतिदिना निमित्ताने माजी विद्यार्थी यांच्या कडून शालेय विद्यार्थाना छत्री व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात गुरुजींनी दिलेली शिकवण, उत्तम ज्ञान, तसेच सत्कर्माची भावना, या मुळे आम्ही घडलो,यशस्वी झालो, तसेच तुम्ही देखील उत्तम शिकवण घ्या, गुरुजींचा आदर करा, आणि उद्याचे यशस्वी नागरीक बना असे माजी विद्यार्थी यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना सांगितले, गुरुजींवर प्रेम करणारी आजी-माजी सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील सर्व माजी विद्यार्थ्यांनी…
राजमुद्रा फाउंडेशनच्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त रोठ बुद्रुक शाळेत शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप “आजचे विद्यार्थीच उद्याच्या भारताचे सक्षम शिल्पकार” – अमित घाग रोहा | प्रतिनिधी : संतोष सातपुते समाजसेवेची अकरा वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करत राजमुद्रा फाउंडेशनने आपल्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त रोठ बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि ग्रामस्थांची उपस्थिती यामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा राजमुद्रा फाउंडेशनचे संस्थापक अमित घाग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजचे विद्यार्थी हेच उद्याच्या राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत. शिक्षणाची आवड, चांगले संस्कार,…
खासदार श्री. सुनील तटकरे यांनी रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागण्यांची रेल्वे बोर्डाकडे केली जोरदार पाठपुरावा रोहा | प्रतिनिधी (संतोष सातपुते) रोहा रेल्वे प्रवासी समितीने मांडलेल्या विविध प्रलंबित मागण्यांची गंभीर दखल घेत खासदार श्री. सुनील तटकरे यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष श्री. सतीश कुमार यांना सविस्तर पत्र पाठवून या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. यामुळे रोहा व कोकणातील हजारो रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची आशा व्यक्त होत आहे. खासदार तटकरे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, रायगड लोकसभा मतदारसंघातील रोहा रेल्वे स्थानक हे औद्योगिक, व्यापारी व प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत उपलब्ध रेल्वे…
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा सेवा उपक्रम; अजितदादा पवारांना अभिवादन, धाटावमध्ये नेत्रतपासणी व वृक्षवाटप रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) रोहा तालुक्यात आगामी स्थानिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने सामाजिक उपक्रमातून जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (देवाभाऊ) यांच्या वाढदिवसानिमित्त आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त धाटाव-खैरवाडी येथे नेत्रतपासणी शिबिर व वृक्षवाटपाचा संयुक्त उपक्रम आयोजित करण्यात आला. भारतीय जनता पार्टी, रोहा तालुका आणि लायन्स हेल्थ फाउंडेशन सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या निमित्ताने भाजपने सेवा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली. भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा पाटील, जिल्हा सरचिटणीस…

