Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला निवृत्त शिक्षकांचा सन्मान कोकण मराठी साहित्य परिषद, रोहा शाखेचा स्तुत्य उपक्रम; १४ निवृत्त शिक्षकांचा घरी जाऊन गौरव
ताज्या बातम्या

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला निवृत्त शिक्षकांचा सन्मान कोकण मराठी साहित्य परिषद, रोहा शाखेचा स्तुत्य उपक्रम; १४ निवृत्त शिक्षकांचा घरी जाऊन गौरव

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरSeptember 5, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला निवृत्त शिक्षकांचा सन्मान

कोकण मराठी साहित्य परिषद, रोहा शाखेचा स्तुत्य उपक्रम; १४ निवृत्त शिक्षकांचा घरी जाऊन गौरव

रोहा प्रतिनिधी – संतोष सातपुते

शिक्षण क्षेत्रात आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य करून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या निवृत्त शिक्षकांचा शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मान करण्यात आला. कोकण मराठी साहित्य परिषद, रोहा शाखेच्या वतीने शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी हा अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.
कोकण मराठी साहित्य परिषद, रोहा शाखेच्या अध्यक्षा सौ. संध्या विजय दिवकर व सचिव श्री. विजय वसंत दिवकर यांच्या कल्पक संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी व सहकाऱ्यांनी निवृत्त शिक्षकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देत त्यांचा सन्मान केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. या उपक्रमांतर्गत एकूण १४ सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अध्यक्षा संध्या विजय दिवकर, सचिव विजय दिवकर, युवाशक्ती प्रमुख शरद कदम, नेहल प्रधान, सहसचिव भरत चौधरी, सुधीर क्षीरसागर, सुप्रिया क्षीरसागर, नारायण पानवकर आदी उपस्थित होते.
गोकुळाष्टमीचे औचित्य साधून ‘कृष्णं वंदे जगद्गुरूम्’ या भावनेतून शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला हा उपक्रम आयोजित करण्यात आला. अखंड जगाचे गुरु भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्मदिनाचे औचित्य आणि गुरु-शिष्य परंपरेचा गौरव यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
भारताचे माजी राष्ट्रपती व महान तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो. विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देण्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि संस्कारांची जडणघडण करण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे शिक्षक दिन हा केवळ औपचारिक सन्मानाचा दिवस नसून ज्ञानदान करणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या निवृत्त शिक्षकांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करण्याच्या कोकण मराठी साहित्य परिषद, रोहा शाखेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ‘गुरुंचा सन्मान म्हणजे ज्ञानपरंपरेचा सन्मान’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून गुरुजनांप्रती असलेला आदर आणि कृतज्ञतेची भावना अधोरेखित झाली.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us