Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»*संस्थेच्या विकासात विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असते त्यामुळे संस्थेला नावलौकीक मिळतो….विश्वस्त मारुती शिर्के गुरुजी *द. ग. तटकरे महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा संपन्न .
ताज्या बातम्या

*संस्थेच्या विकासात विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असते त्यामुळे संस्थेला नावलौकीक मिळतो….विश्वस्त मारुती शिर्के गुरुजी *द. ग. तटकरे महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा संपन्न .

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 5, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*संस्थेच्या विकासात विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असते त्यामुळे संस्थेला नावलौकीक मिळतो….विश्वस्त मारुती शिर्के गुरुजी
*द. ग. तटकरे महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा संपन्न

प्रतिनिधी /किशोर पितळे

विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा येथे प्रथम वर्ष कला वाणिज्य विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ३१ जुलै २०२६ रोजी प्रथम वर्ष कला वाणिज्य विद्या शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर स्तरावर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मंगेश देशमुख यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन पुरुषोत्तम मुळे उपस्थित होते. या समारंभासाठी संस्थेचे विश्वस्त श्री मारुती शिर्के, संस्थेचे सचिव महेंद्र कजबजे बालविकास मंडळाचे चेअरमन, महादेव बैकर, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य द.वा. सप्रे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या समारंभाचे प्रास्ताविक व स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. भगवान लोखंडे यांनी केले. प्रास्ताविक व परिचयाच्या माध्यमातून स्वागत सोहळाच्या औचित्याची मांडणी करत त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी, संस्था पदाधिकारी यांचा परिचय करून दिला.यावेळी संस्थेचे विश्वस्त मारुती शिर्के गुरुजी यांनी प्रथम वर्षे नवागत विद्यार्थांचे स्वागत करून शाळा काँलेज ची शिस्त पाळली पाहिजे.वेळेवर येणे अभ्यास करणे मोबाईल चा वापर न करणे,त्यामुळे आपल्या वैयक्तिक विकासाला बाधा येणार नाही व्यक्तीमत्वविकासघडेल. आपल्यातच झालेला बदल लक्षात येईल आणी आपले उद्धीष्ठ धेय्य शिखर गाठूशकतो.त्यामुळे शाळा काँलेज चे नावलौकिक प्राप्त होतो त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्व विकासाबरोबर आपला समाज गाव व संस्थेचा ही विकास करण्याची महत्वाची भुमिका घ्यावीअसे आवाहन केले. प्राध्यापक डॉ. राजाराम थोरात यांनी महाविद्यालयातील विविध विभागांमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली व त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी प्रथम वर्ष कला, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी प्राथमिक स्वरूपात आपली मनोगत ही व्यक्त केली. डॉ. नानासाहेब यादव यांनी प्राचार्य मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या विकासामध्ये आपण कशी भूमिका बजावावी याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. यावेळी बोलताना द.वा. सप्रे यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींना उजाळा देत या महाविद्यालयाच्या प्रारंभापासून आपण कसे सहभागी आहोत आणि या पुढील काळातही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील सोयी सुविधांचा वापर आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी कसा करावा याची मांडणी केली.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना पुरुषोत्तम मुळे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी महाविद्यालय तत्पर असेल यारौप्यमहोत्सवीवर्षापासून महाविद्यालय काही ध्येय व उद्दिष्टाना घेऊन पुढेजाईल त्यात आपण सर्वांनी साथ संगत करावी असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री मंगेश देशमुख यांनी संस्थेच्या ध्येय धोरणांची मांडणी उपस्थितांसमोर केली या कार्यक्रमाचे आभार डॉ. दत्ता कुंटेवाड यांनी मानले तर निवेदन डॉ तृप्ती थोरात यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापके तर कर्मचारी विद्यार्थी विशेष परिश्रम घेतले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us