Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रायगड येथून राष्ट्रीय मराठा पार्टी तर्फे जनहित दौरा सुरू 5 ऑक्टोबर ला आझाद मैदान मुंबई येथे उपोषणा द्वारे संघर्ष
ताज्या बातम्या

रायगड येथून राष्ट्रीय मराठा पार्टी तर्फे जनहित दौरा सुरू 5 ऑक्टोबर ला आझाद मैदान मुंबई येथे उपोषणा द्वारे संघर्ष

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरSeptember 2, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रायगड येथून राष्ट्रीय मराठा पार्टी तर्फे जनहित दौरा सुरू 5 ऑक्टोबर ला आझाद मैदान मुंबई येथे उपोषणा द्वारे संघर्ष

विशेष प्रतिनिधी (शैलेश गावंड)

दिंनाक 31 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय मराठा पार्टी चे अध्यक्ष श्री अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर यांचे मार्गदर्शन व कुशल नेतृत्याखाली सर्व पदाधिकाऱ्यांनी सकाळी श्रीमंत छञपती शिवाजी महाराज यांचे समाधीचे रायगडावर सकाळी १० वाजता दर्शन घेऊन या संघर्ष कार्याचा शुभारंभ करण्यात आला त्या नंतर दुपारी अलिबाग येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पत्रकार परिषदेत विस्तृत माहिती देण्यात आली त्या नुसार ५ ऑक्टोबर रोजी मुंबई आझाद मैदान येथे विविध मागण्या साठी होणाऱ्या उपोषणा बाबत माहिती देताना पुढील मागण्या सांगितल्या

1)मराठा समाजाला ओबीसींतुन आरक्षण देण्यासाठी हैदराबाद ग्रंथालय रेकॉर्ड शेतकऱ्यांच्या नावांसहीत महाराष्ट्र शासनाने तेलंगाणा सरकार कडुन मागविण्यात येवुन ओबीसींतुन कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे.2)अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळास म.मुंबई कार्यान्वयन करण्यासाठी 850 कोटी रु उपलब्ध करुन देण्यात बाबत 3)महाराष्ट्र राज्यातील मराठी शाळेस 100 % अनुदान देवुन बंद पडलेल्या मराठी चालु करणे.4)वैद्यकीय शिक्षण विभाग मार्फत रुग्णालयातील सर्व सेवा तपासणी,एक्सरे,एम.आर आय,सिटीस्कॅन, सोनोग्रफी,ऑपरेशन औषधी, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाने माफ केली त्याच प्रणाणे वैद्यकीय शिक्षण विभागातील रुग्णालयातील सेवा मोफत करण्यात यावे.5)शेतकऱ्यांचे चालु कर्ज 2 लाख रु कर्ज माफ करणे बाबत.6)शेतकऱ्यांचे 10 एच.पी कृषि विद्युत पंपाचे विज बिल माफ करण्यात यावेत. 7)मुंबई अरबी समुद्रातील नियोजित श्रीमंत छञपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर भव्यदिव्य स्मारक त्वरीत उभारण्यात यावे.8)महाराष्ट्रातील विद्यार्थी/विद्यार्थीनी साठी प्रत्येक तालुका व जिल्हाच्या ठिकाणी राहण्यासाठी वसतीगृह निर्माण करण्यात यावेत9)महाराष्ट्र राज्यात वृद्धाश्रम निर्माण करण्यात यावेत 10)सुशिक्षित युवक बेरोजगारांना बेकारी भत्ता दरमाहा 15,000/- रु देण्यात येवुन स्वंयरोजगार उद्योग धंद्याचे प्रशिक्षक देवुन कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे.11)निराधार, निराश्रीत विधवा महिलांना विना अट दरमाहा 3,000/- रु.उपलब्ध करुन देण्यात यावे.12)आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना शासकीय नौकरीत सामावुन घेण्यात यावे.13)आत्महत्यागृस्त शेतकऱ्यांच्या पाल्याना 10 लाखाची अर्थिक मदत करण्यात यावी.14)ग्रामीण भागातील प्रत्येक खेडेगाव एकमेकांना सिमेंट रस्त्यांनी जोडण्यात यावे.
15)अंपग व शारीरिक दृष्ट्या दुर्बल युवकांना लघु उद्योग कर्ज मंजुर करण्यात यावेत त्यांना व्यवसायाकरिता शासकीय कार्यालय परिसरात हक्काची जागा बांधून देण्यात यावी.16)लाडक्या बहिणीचे 1500 रु दरमाहा नविन नोंदणी चालु करुन विना अट लाडक्या बहिणीचे थांबवलेले अनुदान चालु करण्यात यावेत. 17)महाराष्ट्र राज्यातील शेती साठी जी आय तार काटेरी लोखंडी पोलसह कुंपन करणे बाबत. 18)महाराष्ट्र राज्यातील संवेदनशील 500 मीटरच्या परिसरातील सर्व दारुची दुकाने बंद करणे बाबत.19)लोणावळा ते ऊरळी कांचन पुणे रेल्वे लोकल सेवा एक तासाच्या फरकाने चालु करणे बाबत. 20)देवणी जिल्हा.लातुर येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बस डेपो तात्काळ मान्यता देणे बाबत.21) देवणी तालुका जिल्हा लातुर येथे महापारेषण 132 के.व्ही.चे सब-स्टेशन मंजुर करणे बाबत22)उदगीर ते लातुर-धाराशिव-बार्शी कुर्डवाडी-दोड-पुणे-मुबई रेल्वे सकाळी 10 वाजता व दुपारी 4 वाजता सायंकाळी 7 वा
-लातुर-पुणे-मुबई वंदेमातरम
रेल्वे सकाळी 6 वाजता सोडण्यात यावी.24) लातुर जिल्हातील. वनविभागामध्ये अदगीर ,जळकोट,अहमदपुर, चाकुर,रेणापुर,लातुर, निंलगा,देवणी तालुक्यात मोठया प्रमाणात वृक्ष तोड होत असुन जवळपास 125 आरा मशीन असल्याने फार मोठया प्रमानात वृक्ष तोड अहमदपुर, उदगीर, जळकोट,चाकुर या चार तालुक्यात 45 आर मिशीन आहेत. त्या आराम मिशीनवर बंधने आणणे बाबत. 25)लातुर जिल्हयातील उदगीर व देवणी तालुक्यातील बिअर बार ,देशी दारुची दुकाने मंदीर, मस्जिद, शाळा,बसस्थानक रेल्वे स्टेशन जवळील बिअर बार,देशी दारुची दुकान,वॉइन शाॅप शहरातील नूतनीकरण न करणे बाबत.26)अवैध देशी विदेशी,मोहाची, दारुविक्री करणा-यास मोका कायदा लागु करणे बाबत.
या मागण्यांबाबत
जनसंपर्क दौरा सुरू झाला असून यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष
मा.श्री.अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर ,
राष्ट्रीय उपाध्यक्ष परमेश्वर देशमुख , महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष कल्पना बेढाले,
महाराष्ट्र राज्य संघटक महादेव पालक ,पश्चिम महाराष्ट्र विभागीय संपर्क प्रमुख मनोज बाउस्कर , खेड तालुका उपाध्यक्षा श्रीमती शकुंतला जाधव व अन्य सहकाऱ्या सोबत हा दौरा सुरू झाला आहे
नियोजित दौरा अलिबाग पासून सुरू होऊन त्यानंतर
रत्नागिरी , सिंधुदुर्ग ,कोल्हापूर, सातारा,सांगली ,सोलापूर, धाराशिव शासकीय विश्रामगृह,लातुर, बीड, छ.संभाजीनगर ,परभणी नांदेड , हिंगोली, वाशीम यवतमाळ,वर्धा, नागपुर अमरावती. जळगाव ,बुलढाणा ,अकोला ,धुळे,नाशिक, आणि सर्वात शेवटी दिनांक १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जुन्नर किल्ला येथे श्रीमंत छञपती शिवाजी महाराज दर्शन घेऊन दौरा समाप्त होईल अशी माहिती शुभम पाटील राष्ट्रीय सह सचिव
राष्ट्रीय मराठा पार्टी यांनी दिली

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us