रोटरी क्लब रोहा तर्फे रिक्षा व मिनिडोअर चालकांसाठी महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न
रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते
समाजसेवेची परंपरा जपत रोटरी क्लब रोहा, रोहा-अष्टमी नगरपरिषद आणि सूरज हॉस्पिटल, सानपाडा (नवी मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने रिक्षा व मिनिडोअर चालकांसाठी आयोजित करण्यात आलेले मोफत महाआरोग्य शिबिर, उपचार व औषध वाटप रविवारी (३० ऑगस्ट) भाटे सार्वजनिक वाचनालय, रोहा येथे उत्साहात संपन्न झाले.
रोह्यातील नागरिकांना दिवसरात्र सेवा देणाऱ्या रिक्षा व मिनिडोअर चालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विविध आजारांची तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि आवश्यक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाला चालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.