Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»राजकारण»मनसेच्या मध्य रायगड जिल्हा सचिवपदी अमोल पेणकर यांची फेरनियुक्ती
राजकारण

मनसेच्या मध्य रायगड जिल्हा सचिवपदी अमोल पेणकर यांची फेरनियुक्ती

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 21, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

मनसेच्या मध्य रायगड जिल्हा सचिवपदी अमोल पेणकर यांची फेरनियुक्ती

पक्षनिष्ठेची दखल; राज ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र, सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटनात्मक पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर मध्य रायगड जिल्हा सचिवपदी अमोल पेणकर यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील शिवतीर्थ येथे झालेल्या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
अमोल पेणकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी रोहा शहराध्यक्ष, रोहा तालुकाध्यक्ष तसेच रायगड जिल्हा उपाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी शहर, तालुका आणि जिल्हास्तरावर सातत्याने कार्य करत अनेक संघटनात्मक उपक्रम, आंदोलने आणि जनहिताच्या प्रश्नांवर सक्रिय भूमिका बजावली आहे.
रायगड जिल्ह्यातील अनेक नेते इतर राजकीय पक्षांत दाखल झालेल्या काळातही अमोल पेणकर यांनी मनसेप्रती असलेली निष्ठा कायम ठेवली. विविध राजकीय पक्षांकडून प्रवेशासाठी प्रयत्न आणि प्रलोभने असूनही त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या भूमिकेची दखल घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, युवा नेते अमित ठाकरे, मनसे नेते संदीप देशपांडे, संपर्क अध्यक्ष योगेश परुळेकर, सहसंपर्क अध्यक्ष राजेश येरुणकर तसेच मध्य रायगड जिल्हाध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला.
पक्षाच्या विविध आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेताना त्यांच्यावर काही गुन्हेही दाखल झाले होते. मात्र, कोणत्याही परिस्थितीत त्यांनी पक्षाची भूमिका ठामपणे मांडत संघटनात्मक कार्य सुरू ठेवले. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची आणि पक्षनिष्ठेची पोचपावती म्हणून मध्य रायगड जिल्हा सचिवपदाची जबाबदारी पुन्हा त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
या फेर नियुक्ती नंतर मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अमोल पेणकर यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली मध्य रायगडमध्ये मनसेची संघटनात्मक ताकद आणखी वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोह्यात काँग्रेसचा सरकारविरोधात एल्गार! खड्डे, वाहतूक कोंडी, पेपरफुटीवर सत्ताधाऱ्यांना घेरणार; राजाभाऊ ठाकूर यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आक्रमक बैठक

September 13, 2026

*तळा तालुक्यात भाजपला पुन्हा चांगले दिवस येण्याची दाट शक्यता .राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. *कैलास पायगुडे यांच्या हाती तालुक्याची धुरा;

September 12, 2026

राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात रस्त्याची दैयनीय अवस्था. महागांव पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.

August 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us