Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा सेवा उपक्रम; अजितदादा पवारांना अभिवादन, धाटावमध्ये नेत्रतपासणी व वृक्षवाटप
ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा सेवा उपक्रम; अजितदादा पवारांना अभिवादन, धाटावमध्ये नेत्रतपासणी व वृक्षवाटप

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 23, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा सेवा उपक्रम; अजितदादा पवारांना अभिवादन, धाटावमध्ये नेत्रतपासणी व वृक्षवाटप

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

रोहा तालुक्यात आगामी स्थानिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने सामाजिक उपक्रमातून जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (देवाभाऊ) यांच्या वाढदिवसानिमित्त आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त धाटाव-खैरवाडी येथे नेत्रतपासणी शिबिर व वृक्षवाटपाचा संयुक्त उपक्रम आयोजित करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी, रोहा तालुका आणि लायन्स हेल्थ फाउंडेशन सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या निमित्ताने भाजपने सेवा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली.
भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा पाटील, जिल्हा सरचिटणीस सतीशजी धारप आणि रोहा तालुकाध्यक्ष अमितदादा घाग यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच बूथ अध्यक्ष धर्मा कोकरे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. याचवेळी भाजप धाटाव विभागाध्यक्ष सचिनदादा मोरे यांच्या पुढाकारातून शेतकरी बांधवांना वृक्षांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा अर्पण करताना त्यांच्या नेतृत्वाचा गौरव केला, तर स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याला अभिवादन करून त्यांना आदरांजली वाहिली. राजकीय मतभेद बाजूला ठेवत एका माजी नेत्याला अभिवादन केल्याने या कार्यक्रमाची विशेष चर्चा रंगली.
यावेळी रोहा तालुकाध्यक्ष अमित घाग, नगरसेवक रोशन चाफेकर, तालुका सरचिटणीस कृष्णादादा बामणे, शैलेशजी रावकर, परेश चितळकर, जिल्हा चिटणीस श्रद्धाताई घाग, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष नरेशजी कोकरे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रियाताई कासार, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष विकासजी बामणे, निलेशजी बामणे, संदेशजी बामणे, परशुरामजी माने यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राजकीय कार्यक्रमांना सामाजिक सेवेची जोड देत भाजपने धाटाव परिसरात जनसंपर्क अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा उपक्रमांमुळे राजकीय वातावरण अधिक सक्रिय होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us