कोलाड आंबेवाडी नाक्यावर खड्ड्यात गाड्या अडकण्याच्या प्रक्रिया सुरू, पाहणी करणारा कोणी मंत्री शिल्लक राहिले आहे का? नागरिकांचा सवाल, सर्व्हिस रस्ते निकामी,
ठेकेदारांवर कोणती कारवाई करणार याकडे जनतेचे लक्ष.
कोलाड (श्याम लोखंडे)
मागील सोहळा सतरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असलेल्या पावसात भयानक खड्डे पडण्यास सुरू झाले असून भले मोठे खड़े पडले असुन या खड्ड्यांचा त्रास प्रवाशांसह वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. तर एवढ्येच नव्हे तर त्यात आता वाहने अडकून बंद पडत आहेत.कोलाड आंबेवाडी नाक्यावरील सर्व्हिस रस्त्याची रडकथा रोड झाला निकामी तर नव्याने बनविण्यात आलेल्या उड्डाण फुलाखाली जीवघेणे खड्डे दुचाकी अडकून होतात अपघात भला मोठा खड्डा पडल्याने त्यात वाहने अडकून बंद पडण्याच्या घटना घडत असल्याने याबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.तर दरवर्षी गणेश-ोत्सव जवळ आला की संबंधित मंत्री, पालकमंत्री आणि नेते मंडळी या रस्त्याची पाहणी करण्याचा आव आणतात. अनेक राज्यातील तसेच काही केंद्रीय मंत्र्यांनी देखील या खास राष्ट्रीय महामार्गाला पसंती देत पाहणी दौरा केला त्यात त्यांच्या अनेक डेड लाईन देखील फेल गेल्या मात्र महामार्गाचे काम आजतागायत पूर्ण होत नसल्याने आता अधिक कोणी मंत्री या महामार्गाची पाहणी करण्यास शिल्लक राहिले आहेत का असा सवाल सर्व सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे काम करण्यासाठी अनेक ठेकेदार झाले हा मार्ग तयार करण्यासाठी किती कोटींचा धुरळा उडाला हे मात्र गुलदस्त्यात उड्डाण पूल बनविण्यात कोटी च्या कोटी खर्च केले काही ठिकाणी तयार देखील झाले ते सुरू होताच काही पुलांची प्रकृती चिंताजनक ते ढासळण्याच्या मार्गावर मार्गावरील नागोठणे उड्डाण पूल सुरू केला पहिल्याच पावसामुळे त्याचे काम फोल ठरण्याच्या मार्गावर तर वाहतुकीला कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पुलावरून मार्गक्रम बंद करण्यात आले असल्याचे दिसून येते तर काही ठिकाणी पुलाचा पोट फुगीर झाल्याने कठड्डे ढासळण्याच्या मार्गावर तर सर्व्हिस रोडवरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना व वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो, कोलाड आंबेवाडी नाक्यावर नवा उड्डाण पूल बनवला गेला त्यावर देखील पडला भला मोठ्यापर्यंत खड्डा तर साईड कठड्यांचा पत्ता नाही पुलाखाली अवस्था गंभीर दोन्ही बाजूकडील सर्व्हिस रोड पूर्णतः निकामी याला जबदार कोण ? कोटीच्या कोटी खर्च करून देखील काही ठिकाणी अपूर्ण कामांचा फटका मात्र सर्व सामान्य प्रवासी नागरिक यांना बसत आहे तर ठेकेदाराच्या आडमुठेपणाच्या धोरणांमुळे मार्गालगतचे सर्व्हिस रोड गटारे लाईंची कामे आजही अर्धवट अस्वस्थेत असल्याने ती अर्धवड कामे अपघातास कारणीभूत ठरत आहेत. याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.तर वेगवेगळ्या पक्षांचे सरकार आले. मात्र कोणाच्याही कारकीर्दीत हे काम पुर्ण होत नाही हे कोकण वाशियांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. श्रावण सुरू झाला गणेशोत्सव जवळ आला की दरवर्षी या खड्ड्यांचे दर्शन घेण्यासाठी सदरील आमदार,खासदार,मंत्री आणि पालकमंत्री, बांधकाम मंत्री या महामार्गावर पोहोचतात तेव्हा चोख बंदोबस्त आणि त्यांच्या चोह बाजूला अधिकारी आणि कार्यकत्यांचा गराडा, त्या गराड्यात मंत्र्यांनी दिलेले आदेश आणि फायली चाळत लिखापटी धावत धावत करणारे अधिकारी हे एकप्रकारे आता दिनक्रमच होउन बसले आहे. मात्र या खड्ड्यांबाबत नाही कुणा नेत्याला चिंता की नाही कुणा अधिकाऱ्याला त्याची काळजी हे अनेकदा समोर आले आहे.


