Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»न्हावे येथे ‘पंढरपूर पायी दिंडी’चा मनोहारी देखावा; भक्तिमय वातावरणात गणरायाची आराधना
ताज्या बातम्या

न्हावे येथे ‘पंढरपूर पायी दिंडी’चा मनोहारी देखावा; भक्तिमय वातावरणात गणरायाची आराधना

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरSeptember 22, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

न्हावे येथे ‘पंढरपूर पायी दिंडी’चा मनोहारी देखावा; भक्तिमय वातावरणात गणरायाची आराधना

प्रतिनिधी / सत्यप्रसाद  आडाव चणेरा

दि. २२ सप्टें. कोळी समाज अध्यक्ष न्हावे मनोहर डबीर यांच्या निवासस्थानी यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त ‘पंढरपूर पायी दिंडी’चा आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. पारंपरिक वारकरी संस्कृती, विठ्ठल भक्ती आणि गणेशभक्ती यांचा सुंदर संगम या देखाव्यातून पाहायला मिळत आहे.
गणेशमूर्तीसमोर साकारलेल्या या देखाव्यात पंढरपूरच्या वारीचे दर्शन घडविण्यात आले असून, वारकरी, टाळ-मृदंग, दिंडीतील भक्तगण आणि विविध धार्मिक प्रसंगांच्या प्रतिकृतींमधून महाराष्ट्राच्या समृद्ध भक्तीपरंपरेचे दर्शन घडते. देखाव्याची सजावट आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची आरास आणि विविध रंगसंगतीने करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, पंढरपूरच्या वारीची परंपरा आणि वारकऱ्यांची विठ्ठलावरील श्रद्धा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, तसेच नव्या पिढीला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेची ओळख व्हावी, या उद्देशाने हा देखावा साकारण्यात आला आहे.
देखाव्यातील वारकऱ्यांच्या प्रतिकृती, दिंडीचे वातावरण आणि मध्यभागी विराजमान असलेले गणराय यामुळे संपूर्ण परिसराला भक्तिमय स्वरूप प्राप्त झाले आहे. देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक, भाविक आणि गणेशभक्त आवर्जून भेट देत असून त्यांच्याकडून या संकल्पनेचे कौतुक केले जात आहे.
मनोहर डबीर यांच्या पुढाकारातून साकारण्यात आलेल्या या देखाव्यामुळे न्हावे गावातील गणेशोत्सवाला धार्मिकतेसोबतच सांस्कृतिक आणि सामाजिक संदेशाची जोड मिळाली आहे. महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आणि वारकरी संप्रदायाचा वारसा जपणारा हा देखावा यंदाच्या गणेशोत्सवातील विशेष आकर्षण ठरत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us