Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»‘‘श्वेतराज’मधून उमलली कवयित्री संध्या दिवकर यांची साहित्यिक प्रतिभा ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे शानदार प्रकाशन; “असेच भरभरून लिहा, पुढील काळात तुमची अनेक पुस्तके वाचायला मिळोत”
ताज्या बातम्या

‘‘श्वेतराज’मधून उमलली कवयित्री संध्या दिवकर यांची साहित्यिक प्रतिभा ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे शानदार प्रकाशन; “असेच भरभरून लिहा, पुढील काळात तुमची अनेक पुस्तके वाचायला मिळोत”

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरSeptember 22, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

‘‘श्वेतराज’मधून उमलली कवयित्री संध्या दिवकर यांची साहित्यिक प्रतिभा

ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे शानदार प्रकाशन; “असेच भरभरून लिहा, पुढील काळात तुमची अनेक पुस्तके वाचायला मिळोत”

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

शिक्षिका ते कवयित्री हा संध्या दिवकर यांचा प्रवास सुरेल आणि प्रेरणादायी आहे. *‘बोला पुढारी’*सारख्या मिश्कील कवितेतून त्यांची प्रतिभा दिसून येते. त्यांच्या कविता मार्मिक असून विडंबनात्मक लेखनही सुंदर आहे. “असेच भरभरून लिहा, पुढील काळात तुमची अनेक पुस्तके आम्हाला वाचायला मिळोत,” अशा शुभेच्छा ना. आदिती तटकरे यांनी दिल्या.
रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात कोकण मराठी साहित्य परिषद, रोहा शाखेच्या वतीने कवयित्री संध्या विजय दिवकर यांच्या ‘श्वेतराज’ या पहिल्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा झाला. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा वनश्री शेडगे, ज्येष्ठ साहित्यिक एल. बी. पाटील, कोमसाप जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ, गडदुर्ग अभ्यासक सुखद राणे, गझलकार ज्योत्स्ना राजपूत, सभापती रवींद्र चाळके यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
संध्या दिवकर या रोहा नगरपरिषदेच्या कै. प्रफुल्लशेठ बारटके मंगलवाडी शाळा क्रमांक १० येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असून, कोमसाप रोहा शाखेच्या अध्यक्षा आहेत. काव्यलेखनासोबतच रांगोळी, चित्रकला, गायन, बाहुली नाट्य, आगरी कविता, गझल लेखन आदी विविध कला त्या जोपासत आहेत.
यावेळी नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी संध्या दिवकर या उपक्रमशील शिक्षिका असून उत्तम कवयित्री असल्याचे सांगत त्यांच्या साहित्यिक वाटचालीचे कौतुक केले. साहित्यविषयक उपक्रमांसाठी पालिकेत हक्काची जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
*‘श्वेतराज’*मधील निवडक कवितांचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय दिवकर, पुस्तक परिचय सुखद राणे, सूत्रसंचालन हेमंत बारटक्के, तर आभार भारत चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साहित्यप्रेमी व आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us