रोहा मध्ये दोन दिवस दहीहंडी चा थरार व बक्षिसांची खैरात
रोहा( शैलेश गावंड)
या वर्षीच्या 2026 च्या गोकुळाष्टमीनिमित्त रोहा मध्ये दोन दिवस दहीहंडीचे आयोजन केले होते सर्वप्रथम चार सप्टेंबर रोजी रोहा तालुका शिवसेनेतर्फे ठेवलेल्या दहीहंडी स्पर्धेत 30 पुरुष गोविंदा पथकांसोबतच दहा महिला गोविंदा पथके सुद्धा सहभागी झाले होते पालकमंत्री भरत शेठ भोगावले व आमदार महेंद्र दळवी यांचे मार्गदर्शनाखाली युवा नेते आकाश अशोक धोत्रे व हर्ष पाटील यांचे संयुक्त विद्यमाने आयोजितलेल्या स्पर्धेत एक लाख एकवीस हजार चे पारितोषिक ठेवले होते यावेळी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर ,विकास शेठ गोगावले, अनिल नवगणे, सुमित काते, शिल्पा अशोक धोत्रे नवनिर्वाचित सदस्य संतोष पोटफोडे पूजा पोटफोडे अमित उकडे व असंख्य कार्यकर्ते आणि शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. लोटणेश्वर खारी येथील गोविंदा पथकाने आठ थर रचून प्रथम क्रमांक मिळवला त्यानंतर दिनांक 5 सप्टेंबर रोजी रोहा शहरातील पारंपारिक दहीहंडी उत्सवात नगराध्यक्ष वनश्री समीर शेडगे यांचे उपस्थितीत दहीहंडी सोहळा संपन्न झाला यावेळी भरघोस पारितोषिके देण्यात आली तर रात्री बारा वाजेपर्यंत सुरू असलेल्या नदी संवर्धन गार्डन मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मानाच्या दहीहंडी स्पर्धेत सुनील तटकरे अनिकेत दादा व आदिती ताई तटकरे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत किल्ला येथील गोविंदा पथकाने मानाची दहीहंडी फोडली