तळा शिवसेना तालुका प्रमुख प्रद्युम्नजी ठसाळ यांची फेर निवडीने शिवसैनिकात चैतन्य.
प्रतिनिधी तळा/ किशोर पितळे
शिवसेना मध्यवर्ती कार्यालया कडून प्रभारी तालुका प्रमुख नितीन साळवी यांची नियुक्ती पुढील आदेशा पर्यत स्थगिती देण्यातआल्याचे सचिव संजय मोरे यांच्या सहिने पत्र दिले आहे.त्याचा जागीतळा शिवसेना तालुका प्रमुख पदी प्रद्युम्नजी ठसाळ याची फेरनिवड झाल्याने शिवसैनिकांत चैतन्य निर्माण झाले आहे.यापुर्वी नितीन साळवी यांचीप्रभारी तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या अचानक नियुक्तीने शिवसैनिकात संभ्रम निर्माण झाल्याने शिवसेनेत नक्की चाललंय तरी काय असे वातावरण निर्माण झाले आगामी नगरपंचायत निवडणूक व ग्रामपंचायत निवडणूका उभ्या ठाकल्याने साळवी यांची नियुक्ती का करण्यात आली असा संभ्रम संपूर्ण तालुक्यात निर्माण झाला होता पण आता प्रद्धुम्न ठसाळ याची फेर निवड झाल्याने आनंदी वातावरण झाले आहे.प्रद्धुम्न ठसाळ कट्टर शिवसैनिक सर्वांना बरोबर घेऊन संघटना चालवीत असून स्व. बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या विचाराने राजकारणापेक्षा समाज कारण करून शिवसेना मुख्य नेते तथा उप मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे,रोजगार फलोत्पादन खारभूमी कँबिनेट मंत्री ना.भरतशेठ गोगावले जिल्हा प्रमुख प्रमोदजी घोसाळकर यांच्या माध्यमातून तळा शहरासाठी १४ कोटीचा वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात मोलाचा वाटा आहे.त्याबरोबर ग्रामीण भागातील विकास कामे आणून पुर्ण केली त्यामुळे समाजकारणातून पक्ष संघटना मजबूत केली आहे याचा वेध घेऊन उपमुख्यमंत्री यांच्या आदेशा नुसार प्रद्युम्न ठसाळ यांच्या फेर नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी तालुक्यात कामाला लागण्याचा आदेश दिला आहे प्रद्धुम्नजी ठसाळ यांनी जिल्हा प्रमुख प्रमोदजी घोसाळकर,विधान सभा संपर्क प्रमुख अनिलजी नवगणे संपर्क प्रमुख अरुण चाळके शहरप्रमुख राकेशजी वडके कोअर कमिटी सदस्य लिलाधर खातू यांचे आभार व धन्यवाद व्यक्त केले त्याचे शिवसैनिक व तालुक्यातील सर्व जनतेतून अभिनंदन केले जात आहे.