Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रायगडात आभाळ कोसळले, कुंडलीका, महिसदरा, आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली रोह्यात पूरपरिस्थिती मुंबई गोवा महामार्गावर पुराचे पाणी वाहतूक ठप्प, रोहा नागोठणे मार्गावर झाड कोसळले.
ताज्या बातम्या

रायगडात आभाळ कोसळले, कुंडलीका, महिसदरा, आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली रोह्यात पूरपरिस्थिती मुंबई गोवा महामार्गावर पुराचे पाणी वाहतूक ठप्प, रोहा नागोठणे मार्गावर झाड कोसळले.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 5, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रायगडात आभाळ कोसळले, कुंडलीका, महिसदरा, आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली रोह्यात पूरपरिस्थिती मुंबई गोवा महामार्गावर पुराचे पाणी वाहतूक ठप्प, रोहा नागोठणे मार्गावर झाड कोसळले.

कोलाड (श्याम लोखंडे ) रायगडात आभाळ कोसळले रायगड सह रोहा तालुक्यात गेली चार पाच दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, रविवारी ५ जुलै रोजी तालुक्यातील कुंडलिका, महिसदरा आणि आंबा,नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने नदी नाले भरभरून वाहत असल्याने सर्वत्र पुराचे पाणी भरले मुंबई गोवा महामार्गावर सुकेळी महाराष्ट्र सिमलेस आणि जिंदाला कंपनी जवळ मार्गावर पुराचे पाणी साचल्याने मार्गावरील महाड कोलाड कडून मुंबई कडे जाणारी वाहतूक आणि मुंबई नागोठणे कडून कोलाड महाड कडे येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती तर रोहा नागोठणे मार्गावर भिसे खिंडीत झाड पडल्याने या मार्गावरीळ देखील वाहतूक काही काळ ठप्प झाल्याने असंख्य वाहनचालक आणि प्रवाशांचे प्रचंड हाल झाले तर पुरामुळे रोहा-अष्टमी दरम्यानचा मुख्य पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील तसेच रोहा कोलाड मार्गावरील बाय पास बेंडा कॉम्लेस समोरील मार्गावर पाणी साचून राहिल्याने वाहतूक पूर्णपणे बंद आणि कोंडी झाली होती. तसेच धाटाव स्टॉप येथील वस्तीत पुराचे पाणी शिरल्याने त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मुंबई गोवा महामार्ग,कोलाड रोहा मार्ग, रोहा नागोठणे मार्गावर वाहतूक सेवा विस्कळीत

मुसळधार पावसामुळे रोहा-अष्टमी पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग रहदारीसाठी धोकादायक ठरला आहे. यामुळे रोह्यावरून मुंबई, पुणे, अलिबाग, नागोठणे आणि पालीकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच विशेष म्हणजे रोहा नागोठणे मार्गावर भिसे खिंडीत झाड आणि दरड कोसळल्याने नागोठणे मार्ग बंद होता, तसेच अष्टमी पुलावरून पाणी वाहून जात असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. तसेच मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे कोलाड दरम्यातील सुकेळी येथे मार्गावर खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने जवळपास पहाटे चार वाजल्यापासून येथील वाहतूक ठप्प झाली होती एवढ्येचं नव्हे तर दोन्ही बाजूंनी लांबच लांब वाहनाची रांग लागली होती.त्यामुळे वाहन चालक आणि प्रवास करणारे प्रवासी यांचे प्रचंड हाल झाले .तर वाहतुक नियंत्रित करण्यासाठी नागोठणे आणि कोलाड पोलिस तसेच वाहतूक पोलिस यंत्रणा सज्ज झाली होत शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

प्रशासन सतर्क

खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने तत्काळ पावले उचलली आहेत. रोहा पोलीस आणि नगरपरिषदेचे कर्मच पुलाच्या दोन्ही बाजूला तैनात करण्यात आले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुलावरील वाहतूक पूर्णपणे रोखण्यात आली आहे. अष्टमी शहरातील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. रोह अष्टमी नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून, गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तालुक्यात पावसाचा जोर अद्याप कायम असल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशार देण्यात आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us