Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»*आदर्श नगरातील सांडपाणी व पाणीपुरवठा समस्यांवर ग्रामस्थ आक्रमक; ग्रामपंचायतीकडे निवेदन*
ताज्या बातम्या

*आदर्श नगरातील सांडपाणी व पाणीपुरवठा समस्यांवर ग्रामस्थ आक्रमक; ग्रामपंचायतीकडे निवेदन*

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 4, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*आदर्श नगरातील सांडपाणी व पाणीपुरवठा समस्यांवर ग्रामस्थ आक्रमक; ग्रामपंचायतीकडे निवेदन*

रोहा:समीर बामुगडे

रोह तालुक्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील आदर्श नगर परिसरात सांडपाणी व्यवस्थापन आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले असून, संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात परिसरातील रहिवाशांनी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आदर्श नगर परिसरातील अनेक सांडपाणी चेंबर गेल्या अनेक दिवसांपासून तुंबलेल्या अवस्थेत आहेत. चेंबरमध्ये गाळ व कचरा साचल्याने सांडपाण्याचा निचरा होत नसून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.

याशिवाय काही चेंबरची झाकणे तुटलेली असून काही चेंबर उघड्या अवस्थेत असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे. परिसरात लहान मुले खेळत असल्याने कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उघड्या व धोकादायक चेंबरवर तात्काळ मजबूत लोखंडी सुरक्षा जाळी बसवण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, आदर्श नगरमध्ये पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीपुरवठा वारंवार खंडित होत असून नळाद्वारे मिळणारे पाणी गढूळ आणि अशुद्ध असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. अशा पाण्यामुळे नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून साथीचे रोग पसरण्याची शक्यता वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर परिसरातील सर्व चेंबरची तातडीने साफसफाई करावी, उघड्या चेंबरवर सुरक्षा जाळ्या बसवाव्यात तसेच पिण्याच्या पाण्याची लाईन दुरुस्त करून नियमित व शुद्ध पाणीपुरवठा सुरू करावा, अशा प्रमुख मागण्या ग्रामस्थांनी केल्या आहेत.

प्रशासनाने या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा नागरिकांना पुढील आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो, असा इशाराही काही रहिवाशांनी दिला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us