अलिबाग-नागोठणे मार्गावर टेम्पो-मोटारसायकलचा भीषण अपघात, एक ठार; पोलिसांची तत्परता*
नागोठणे प्रतिनिधी -दिपक सोनवणे
*नागोठणे, 3 जुलै 2026:* रायगड जिल्ह्यातील *अलिबाग-नागोठणे मार्गावर नागोठणे रिलायन्स कंपनीजवळ* *दि. 03/07/2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता* टेम्पो आणि मोटारसायकल यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
मोटारसायकलस्वार *नागोठणेकडून अलिबागकडे* जात असताना समोरून येणाऱ्या *MH06 CP 0727* क्रमांकाच्या टेम्पोला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मोटारसायकलचा चक्काचूर झाला.
या अपघातात मोटारसायकलवरील गणपत महादू शिंद (रा. काळ्याची वाडी, बेणसे)* यांचा जागीच मृत्यू झाला. तर होनाजी गंगाराम पारधी (रा. काळ्याची वाडी, बेणसे)* हे गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दाखवली तत्परता
घटनेची माहिती मिळताच *नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रवींद्र पारखे साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली *पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश खंबीर* व *पोलीस कॉन्स्टेबल शिवदास धूळगुंडे* यांनी घटनास्थळी धाव घेतली. *या दोघांनी तातडीने धावपळ करून अॅम्ब्युलन्स बोलावली व जखमींना रुग्णालयात हलवण्यास मदत केली. तसेच वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून तात्काळ ट्रॅफिक मोकळी करून दिली.* त्यांच्या तत्परतेमुळे जखमीला वेळेत उपचार मिळाले.
*नागोठणे पोलिसांकडून पुढील अधिक तपास सुरू* आहे.