Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»इंदापूर -आगरदांडा रस्ता मृत्यूचा ठरतोय सापळा.? *तळा तारणे अवघड वळणावर पुन्हा अपघात; *कंत्राटदार आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे निष्पापांचे किती बळी घेणार?
ताज्या बातम्या

इंदापूर -आगरदांडा रस्ता मृत्यूचा ठरतोय सापळा.? *तळा तारणे अवघड वळणावर पुन्हा अपघात; *कंत्राटदार आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे निष्पापांचे किती बळी घेणार?

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 3, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*इंदापूर -आगरदांडा रस्ता मृत्यूचा ठरतोय सापळा.?
*तळा तारणे अवघड वळणावर पुन्हा अपघात; *कंत्राटदार आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे निष्पापांचे किती बळी घेणार?

तळा किशोर पितळे

तळा शहराजवळील ‘तारणेची डाग’ (वळण) आता मृत्यूचा सापळा बनली आहे. गुरुवार, दिनांक २ जुलै २०२६ रोजी ६.३०वा दरम्यान याठिकाणी पुन्हा एक थरकाप उडवणारी घटनाघडली. एक अवाढव्य ट्रक या तीव्र उतरत्या वळणावर पलटी झाला असून, चालक ट्रकमध्येच अडकल्याची माहिती समोर आली आहे.सुदैवाने जीवीत हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली आहे.या धोकादायक वळणावर आणि तीव्र उतारावर वारंवार अपघात होत असून,आतापर्यंतअनेकप्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.वर्षभरात चार अपघात घडले घडले आहेत या अपघातांची नोंद पोलीस ठाण्यात केवळ ‘अपघात’ म्हणून केली जाते. परंतु, या अपघातांचे खरे कारण नव्याने बांधलेला रस्ता आणि त्यावरील धोकादायक वळण हेच आहे.इंदापूर ते आगरदांडा या महामार्गावर अशी अनेक भयानक वळणे आहेत.रस्ता तयार करताना संबंधित यंत्रणेने कोणताही तांत्रिक विचार केला नाही का, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.महामार्गावरील वळणाचा कोन आणि त्याचा तिरकेपणा बँकिग किती असावा, याचा कोणताही अभ्यास न करता हा रस्ता बनवला गेल्याचे वारंवार होणाऱ्या अपघातांवरून स्पष्ट होत आहे. एकाच वळणावर जर वारंवार अपघात होत असतील, तर त्याला केवळ चालक जबाबदार नसून रस्ता बनवणारे कंत्राटदार आणि अभियंतेही तितकेच जबाबदार आहेत.असे जाणकार चालकांचे म्हणणे आहे याकडे वाहतूक पोलीस आणि प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. शेकडो नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंत्राटदारावर आणि नियंत्रण ठेवायला अपयशी ठरलेल्या संबंधितावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे. या संपूर्ण रस्त्याचे तातडीने ‘तांत्रिक ऑडिट’ (Technical Audit) करून दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच अपघात रोखण्यासाठी या ठिकाणी तातडीने तीव्र उतारापासून समान उंचींचे रब्रींग स्पीड ब्रेकर, रेडियम इंडिकेटर्स, गतिरोधक, धोक्याचे सिग्नल आणि फलक लावण्यात यावेत, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us