Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • तळा येथे ८० वा स्वातंत्र्य दिन व मुख्य शासकीयकार्यालयात ध्वजारोहण संपन्न.
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»राज्य»धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कॅन्टीन सेवांवर आंतरराष्ट्रीय संकटाचे सावट; कामगार अडचणीत
राज्य

धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कॅन्टीन सेवांवर आंतरराष्ट्रीय संकटाचे सावट; कामगार अडचणीत

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 23, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कॅन्टीन सेवांवर आंतरराष्ट्रीय संकटाचे सावट; कामगार अडचणीत

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

धाटाव औद्योगिक क्षेत्रात सध्या एक गंभीर व चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक कारखान्यांच्या कॅन्टीन सेवांवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे थेट परिणाम होत असल्याचे चित्र समोर आले आहे. विशेषतः आखाती देशांतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, “पैसा आहे, पण गॅस नाही” अशी विचित्र अवस्था उद्योग परिसरात पाहायला मिळत आहे.
गॅस अभावी अनेक कॅन्टीनमध्ये स्वयंपाक व्यवस्थाच कोलमडली आहे. काही ठिकाणी चपाती पूर्णपणे बंद करण्यात आली असून, कामगारांना फक्त उपमा, पोहे किंवा शिरा यांसारख्या मर्यादित पदार्थांवर समाधान मानावे लागत आहे. तर काही कारखान्यांनी फक्त नाश्त्यावरच कॅन्टीन सेवा मर्यादित केली आहे. यामुळे कामगारांच्या दैनंदिन आहारात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे.
अनेक ठिकाणी दोन भाज्यांऐवजी एकच भाजी, तसेच ताक, दही यांसारखे पूरक पदार्थ पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. गॅस बचतीसाठी तळणाचे पदार्थही टाळले जात आहेत. काही कारखान्यांनी तर चुलीवर स्वयंपाक करण्याचा पर्याय स्वीकारला असला, तरी त्यातूनही नियमित आणि संतुलित आहार देणे कठीण ठरत आहे.
या परिस्थितीमुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “जेवणाची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही घटले आहे,” अशी तक्रार अनेक कामगारांनी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी कॅन्टीन सेवा पूर्णपणे बंद होण्याच्या उंबरठ्यावर असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे ही समस्या अधिकच तीव्र झाली आहे. उद्योग क्षेत्र आर्थिकदृष्ट्या सक्षम असतानाही, मूलभूत सुविधा पुरवण्यात अडथळे निर्माण होत असल्याने कामगारांवर त्याचा थेट परिणाम होत आहे.
एकूणच, धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कॅन्टीन व्यवस्थेचे भवितव्य सध्या आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीवर अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले आहे. आखाती देशांतील तणाव कधी निवळणार, याकडे उद्योगपती आणि हजारो कामगारांचे लक्ष लागून आहे. तोपर्यंत मात्र कामगारांना अपुऱ्या आणि असंतुलित आहारावर दिवस काढण्याची वेळ आली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या वतीने मोफत चष्मा वाटप.

August 9, 2026

शेताच्या बांधावर शेतकऱ्यांचा सन्मान; प्रगतशील शेतकऱ्यांचा रोहा प्रेस क्लबकडून गौरव!

August 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

तळा येथे ८० वा स्वातंत्र्य दिन व मुख्य शासकीयकार्यालयात ध्वजारोहण संपन्न.

August 15, 2026

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us