मुरुडच्या वसंतराव नाईक महाविद्यालयात स्वच्छता अभियान व एड्स जनजागृती’ निबंध स्पर्धा
कोर्लई,ता.३(राजीव नेवासेकर)
कोकण उन्नती मित्रमंडळ संचलित मुरुडच्या वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालयात (E10) “स्वच्छता ही सेवा – स्वच्छ भारत, विकसित भारत” अभियानाअंतर्गत ‘एक तास, एक साथ’ स्वच्छता उपक्रम तसेच एड्स जनजागृती’ विषयावर निबंध स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून संपूर्ण महाविद्यालय परिसराची स्वच्छता केली. या उपक्रमाच्या माध्यमातून”स्वच्छता हीच सेवा” हा संदेश समाजात पोहोचविण्यात आला.
कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि रेड रिबीन क्लब (RRC) यांच्या संयुक्त विद्यमाने एच.आय. अर्थात एड्स जनजागृती’ या विषयावर निबंध स्पर्धा पार पडली. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. के. कांबळे यांनी आरोग्यविषयक आणि सामाजिक जनजागृतीचे महत्त्व विषद करून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी महाविद्यालय विकास समिती सदस्य ॲड.इस्माईल घोले,विश्वास चव्हाण,वासंती उमरोटकर यांनी या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा प्रवेश पाटील, प्रा.सिद्धेश सतवीडकर, रुफी हसवारे यांनी कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे आयोजन केले.यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी कार्यक्रम अधिकारी श्रीशैल भैरगुंडे, प्रा.बागुल, प्रा. म्हात्रे, प्रा.सीमा नाहिद, प्राध्यापक,कर्मचारी वृंद,विद्यार्थी उपस्थित होते.