Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»कर्तव्यावर असलेल्या पोलिस जवानाचा भीषण अपघातात मृत्यू; स्वतः कार चालवत असताना काळाचा घाला, पत्नी गरोदर
ताज्या बातम्या

कर्तव्यावर असलेल्या पोलिस जवानाचा भीषण अपघातात मृत्यू; स्वतः कार चालवत असताना काळाचा घाला, पत्नी गरोदर

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 17, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

कर्तव्यावर असलेल्या पोलिस जवानाचा भीषण अपघातात मृत्यू; स्वतः कार चालवत असताना काळाचा घाला, पत्नी गरोदर

प्रतिनिधी /गणेश पवार 

कर्जत–मुरबाड महामार्गावरील कळंब–चाहूचीवाडी परिसरात बुधवारी (१५ जुलै) रात्री झालेल्या भीषण अपघातात श्रीवर्धन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस जवान ऋतिक किसन ढोले (वय २६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातावेळी ऋतिक हे स्वतः इको कार चालवत असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात अन्य चार जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऋतिक ढोले हे आपल्या चार मित्रांसह इको कारमधून कळंब येथून चाहूचीवाडी येथील आपल्या घरी निघाले होते. रात्रीच्या सुमारास गावाजवळील धोकादायक वळणावर कारवरील त्यांचा ताबा सुटल्याने वाहन भरधाव वेगात रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी संरक्षक रेलिंगवर जाऊन जोरात आदळले. धडक इतकी भीषण होती की कारचा एक भाग हवेत उचलला गेला आणि वाहनाचे मोठे नुकसान झाले.

अपघाताची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळंब पोलीस चौकीचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने सर्व जखमींना बाहेर काढून भिवपुरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या ऋतिक ढोले यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. अन्य चार जखमींपैकी दोघांना किरकोळ दुखापत झाली असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यापैकी एका जखमीला पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालय, पनवेल येथे हलविण्यात आले आहे.

ऋतिक ढोले हे सुमारे दोन वर्षांपूर्वी वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाले होते. ते सध्या श्रीवर्धन पोलीस ठाण्यात कार्यरत होते. नुकतेच त्यांचा विवाह झाला होता आणि त्यांची पत्नी गरोदर असल्याने या दुर्दैवी घटनेने ढोले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका तरुण पोलिस जवानाचा अशा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने पोलीस दलासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या अपघाताचा पुढील तपास नेरळ पोलीस करीत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us