Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त रोहेकरांना अनमोल भेट; राजमुद्रा फाउंडेशनची रुग्णवाहिका जनसेवेत दाखल
ताज्या बातम्या

रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त रोहेकरांना अनमोल भेट; राजमुद्रा फाउंडेशनची रुग्णवाहिका जनसेवेत दाखल

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 3, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त रोहेकरांना अनमोल भेट; राजमुद्रा फाउंडेशनची रुग्णवाहिका जनसेवेत दाखल

रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते

लोकनेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रोहा तालुक्यातील नागरिकांना राजमुद्रा फाउंडेशनच्या माध्यमातून अत्याधुनिक रुग्णवाहिकेची भेट देण्यात आली. मा. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष सहकार्यातून ही रुग्णवाहिका जनसेवेसाठी समर्पित करण्यात आली.
पनवेल येथे मंगळवार (दि. २) रोजी झालेल्या लोकार्पण सोहळ्यात रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे धाटाव विभाग, धाटाव एमआयडीसी परिसर तसेच संपूर्ण रोहा तालुक्यातील नागरिकांना तातडीच्या वैद्यकीय सेवांचा मोठा आधार मिळणार आहे.
ग्रामीण भागात अनेकदा वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत ही रुग्णवाहिका केवळ वाहन नसून गरजूंसाठी जीवनदायिनी ठरणार असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देत राबविण्यात आलेला हा उपक्रम सर्व स्तरांतून कौतुकास पात्र ठरत आहे.
यावेळी राजमुद्रा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित घाग, सचिव सचिन मोरे, श्रद्धा घाग, शिवाजी दिवकर, सार्थक डाके, साईश घाग, कार्याध्यक्ष राजेश भगत, श्रीकांत दरडे, प्रितेश वारंगे, अमोल घाग, जितेंद्र जाधव, अमर वारंगे, सागर डाके, विलास डाके, श्रद्धा कुंडे, रवी ठाकूर, सुबोध पाटील, साहिल जोधले तसेच ॲड. दिनेश वर्मा यांनी उपस्थित राहून अथवा ऑनलाईन माध्यमातून सहभाग नोंदविला.
याप्रसंगी बोलताना रामशेठ ठाकूर म्हणाले, “समाजसेवा ही केवळ शब्दांत नसून ती कृतीतून दिसली पाहिजे. एखाद्या गरजू रुग्णाला योग्य वेळी उपचार मिळणे आणि त्याचा जीव वाचणे यापेक्षा मोठे पुण्य दुसरे नाही. ही रुग्णवाहिका अनेक गरजू रुग्णांना वेळेत वैद्यकीय सेवा मिळवून देईल आणि अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरेल.”
तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी राजमुद्रा फाउंडेशनचे संस्थापक अमित घाग यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि जनकल्याण क्षेत्रात फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रम प्रेरणादायी असल्याचे सांगत, समाजहिताची जाणीव ठेवून कार्य करणारे तरुण नेतृत्व भविष्यात अधिक व्यापक स्तरावर जनसेवा करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रोहेकरांच्या सुख-दुःखात कायम सहभागी राहण्याची परंपरा जपणाऱ्या ठाकूर कुटुंबाच्या जनसेवेच्या वाटचालीतील हा आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात असून, भविष्यात हजारो गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळवून देत ही रुग्णवाहिका अनेकांचे प्राण वाचविण्यात मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us