मातृछाया मुद्रणालयाचे मालक नंदू रोडे यांना मातृ शोक.
तळा -किशोर पितळे
मातृछाया मुद्रणालयाचे मालक नंदू रोडे यांच्या मातोश्री जयश्री विजय रोडे यांचे दि.१नोव्हेंबर २६ रोजी वृद्धापकाळाने अल्प आजाराने निधन झाले मृत्यू समई ८० वर्षाच्या होत्या. पश्चात दोन मुलगे एक मुलगी सुना जावई नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाची बातमी समजताच अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. अंत्यविधी वेळी अनेक ज्ञाती बांधवांनी शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहीली कै.जयश्री यांना रोडे बाई या नावाने ओळखहोती.प्राथमिक शाळा बोरघर येथे काही वर्ष शिक्षक म्हणून काम केले त्यानंतर स्वेच्छा निवृत्ती घेऊन संसार सांभाळला पडत्या काळात घराला सावरण्याचा प्रयत्न करून बेड्याचे घर बनवले.ज्याप्रमाणे घर बांधण्यासाठी मजबूत पायाची गरज असते त्याप्रमाणे जीवन साध्य करण्यासाठी कुटुंबाला सावरण्यासाठी बाईंनी मोठी मेहनत घेतली.सर्वात मोठ्या असल्याने जबाबदारी पडली होती. ती समर्थपणे पेलली.
कुटुंबात अनेक सुख दु:खाची वादळे आली त्या संयमी, शांत,मित भाषी,परोपकारी धार्मिक वृत्तीच्या होत्या.व्रत वैकल्ये सणवार सामाजिक कार्यात महत्त्वाचा भुमिका बजावत होत्या.पती विजय रोडे यांच्या चार वर्षापूर्वी निधनानंतर मनातून खचल्या होत्या.तरी देखील सावरल्या वयोमाना नुसार आजार डोकावू लागले घरात पडल्यावर त्यावर देखील इच्छाशक्ती बळावर मात करून सावरल्या होत्या. आणी अल्प आजाराने निधन झाले.त्याचे दशविधी मंगळवारी दि.१०नोव्हेंबर रोजी व उत्तम कार्य तेरावे शुक्रवार दि.१३ नोव्हेंबर रोजी रहात्या घरी तळे मुक्कामी होणार आहे.