रोह्यात भक्तिभावात वसुबारस उत्सव साजरा; गोमातेचे पूजन करून गोसेवकांचा सन्मान
रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)
दिवाळीचा पहिला दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसुबारस सणानिमित्त रोहा शहरात गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी भक्तिमय वातावरणात गोमातेच्या पूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. दरवर्षीप्रमाणे यंदाही राम-मारुती चौक येथे प्रत्यक्ष गाय व वासराचे पूजन करून वसुबारस साजरी करण्यात आली.
“दिवाळीचा पहिला दिवा गायीच्या पायाशी लागतो, तर गायीच्या सेवेतच लक्ष्मीचा वास असतो,” या श्रद्धाभावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला रोहेकरांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी गोमातेचे विधिवत पूजन करून तिचे आशीर्वाद घेण्यात आले.