Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
ताज्या बातम्या

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरOctober 2, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

कोलाड :- रोहा तालुक्यातील कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताह दरवर्षी देशभरात आणि जागतिक स्तरावर अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.या अनुषंगाने ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला, १ आणि २ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती) पासून या सेवा सप्ताहाचा प्रारंभ करण्यात येतो याच पार्श्वभूमीवर कोलाड लायन्स क्लबच्या वतीने या सेवा सप्ताह उपक्रमांचा शुभारंभ मोठ्या उत्साही वातावरणात वृक्ष रोपण करत ग्रुप ग्राम पंचायत खांब हद्दीतील रायगड जिल्हा परिषद शाळा नडवली येथील विद्यार्थ्यांचे मोफत आरोग्य तपासणी आणि त्यावर निदान औषोधोचार तसेच खाऊ वाटप करून करण्यात आली आहे.

लायन्स क्लब्स इंटरनॅशनल (Lions Clubs International) च्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या या सेवा सप्ताहांचे मुख्य उद्दिष्ट समाजातील गरजू घटकांपर्यंत विविध सेवा पोहोचवणे हे असते. तसेच या उपक्रमांतर्गत खालील प्रमुख सेवा कार्ये राबवली जात असून १ ऑक्टोबर रोजी या सेवा सप्ताहाच्या शुभारंभाचे आयोजन डिस्ट्रिक्ट कॉर्डनेटर तथा जी एस टी कोर्डनेटर एम जे एफ लायन अनिल म्हात्रे यांनी अलिबाग येथे केले होते.यावेळी डिस्ट्रिकचे जिल्हा प्रांतपाल पी एम जे एफ लायन प्रविण सरनाईक,उप प्रांतपाल पी एम जे एफ लायन विजय गणात्रा, पी एम जे एफ लायन डॉ.नमिता मिश्रा, माजी प्रांतपाल पी एम जे एफ लायन अनिल जाधव, अलिबाग नगर रिजन वन चेअर पर्सन एम जे एफ लायन विद्या अधिकारी सह मान्यवर यांच्या उपस्थितीत कॅन्सर चाईल्ड वूड यावर कार आणि बाईक रॅली काढून जनजागृती करत त्याचे शुभारंभ करण्यात आले याप्रसंगी बहुसंख्येने क्लबचे लायन सदस्य उपस्थित दरम्यान अनेक स्थानिक लायन्स क्लबच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.

सदरच्या ऑक्टोबर सेवा सप्ताहात प्रमुख स्थानिक क्लबांच्या वतीने पारंपरिक सेवा सप्ताहाचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये नेत्र तपासणी शिबिर मोती बिंदू शस्त्रक्रिया,रक्तदान शिबिरे,मधुमेह तपासणी,अन्नदान,वृक्ष रोपण, चाईल्ड वूड कॅन्सर आवरनेस, वाहतूकीवर जनजागृती, सायबर क्राईम यावर मौलिक मार्गदर्शन,विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप, दृष्टी सेवा सप्ताह म्हणून जागतिक दृष्टीदिन विविध सह विषयांवर शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, हेल्थ किट वाटप,आरोग्य तपासणीचे कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येतात.

नडवली शाळेत कोलाड लायन्स क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी प्रसंगी अध्यक्ष डॉ.श्याम लोखंडे खांब ग्राम पंचायतीचे माजी सरपंच तथा समाजसेवक मनोज शिर्के, लायन्स क्लबचे सेक्रेटरी अनिल महाडिक, उपाध्यक्ष डॉ विनोद गांधी, माजी अध्यक्ष रवींद्र लोखंडे, लायन नंदकुमार कळमकर, दिलीप मोहिते, संदीप माने, चितळकर, शाळेचे मुख्याध्यापक किशोर जाधव, सह शिक्षिका रेखा गोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रेरणा मोहिते, संगीता चव्हाण,प प्रज्ञा मोरे सह मान्यवर तसेच आदी विद्यार्थी वर्ग उपस्थित सर्व १३ विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी जनरल सर्जन डॉ.विनोद गांधी यांनी केली तर निदानावर समाज सेवक मनोज शिर्के यांच्या विशेष सहकार्यातून औषधोपचार देण्यात आली.तर यावेळी महात्मा गांधी जयंती निमित्ताने येथील विद्यार्थ्यांनी त्यांचे महत्व पटवून दिले तर विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांचे हस्त कलेतून तयार केलेल्या चित्रांची पाहणी उपस्थित मान्यवरांनी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

प्रतिक्रिया
लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231 ए 4 रिजन वन झोन तीन द्वारे स्थानिक स्तरावरील उपक्रम लायन्स क्लब कोलाड तसेच विविध स्थानिक शाखांद्वारे वृक्ष रोपण,शाळांमध्ये आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी व मोती बिंदू शस्त्रक्रिया, आणि मधुमेह तपासणी, कॅन्सर चाईल्ड वूड यावर ज्येष्ठ तज्ञांचे मार्गदर्शन, सायबर क्राईम यावर मार्गदर्शन,यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात.
डॉ. श्याम लोखंडे अध्यक्ष कोलाड.

प्रतिक्रिया.
कोलाड लायन्स क्लब गेली अनेक वर्षे कोलाड खांब परिसरात विविध उपक्रम राबवत असून समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत तसेच त्या माध्यमातून सामाजिक सेवा देत आहेत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व मोती बिंदू शस्त्रक्रिया, शैक्षिक साहित्य वाटप असे विविध प्रकारचे उपक्रम ग्रामीण भागात राबविण्यात यशस्वी ठरत आहेत.
मनोज शिर्के माजी सरपंच व समाज सेवक

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us