Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गणेशभक्तांच्या सेवेसाठी भाजपाचा सेवाभावी पुढाकार! रोह्यात मोफत मिनीडोअर बससेवेचा शुभारंभ; रविंद्र चव्हाणांकडून अमित घाग यांच्या उपक्रमाचे कौतुक
  • *रोहा शहरात गणेशोत्सवानिमित्त भव्य स्वच्छता अभियान; ४२१ श्री सदस्यांच्या श्रमदानातून २७ टन कचरा संकलित*
  • दमखाडी नाल्याच्या दुरुस्तीला अद्याप मुहूर्त नाही! ३० जुलैच्या दुर्घटनेनंतरही काम रखडले; गणेशोत्सव तोंडावर, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
  • रायगड जिल्ह्याची आपत्ती प्रतिसाद क्षमता बळकट करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनकडून बचाव नौका व आपत्कालीन साहित्याचे वितरण.
  • *द.ग.तटकरे महाविद्यालयाचे वादविवादात मुंबई विद्यापीठात सुवर्ण यश.महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा रोवला तुरा *ध्रुव राऊत ठरला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट वक्ता
  • तळा शिवसेना तालुका प्रमुख प्रद्युम्नजी ठसाळ यांची फेर निवडीने शिवसैनिकात चैतन्य.
  • समाजसेवेच्या कार्याचा शिर्डीत गौरव; डॉ. फरीद चिमावकर यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गौरव’
  • निडी येथील पंकज मढवी यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली वीज वितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून हळहळ; कुटुंबीयांना मदतीसाठी प्रयत्न
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»युवाशक्तीला रोजगाराची दिशा; प्रमोद म्हसकर प्रतिष्ठानच्या भव्य रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद! ६५ नामांकित कंपन्यांचा सहभाग; २,२३७ उमेदवारांची नोंदणी, ४३७ युवकांची जागेवरच निवड
ताज्या बातम्या

युवाशक्तीला रोजगाराची दिशा; प्रमोद म्हसकर प्रतिष्ठानच्या भव्य रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद! ६५ नामांकित कंपन्यांचा सहभाग; २,२३७ उमेदवारांची नोंदणी, ४३७ युवकांची जागेवरच निवड

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 31, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

युवाशक्तीला रोजगाराची दिशा; प्रमोद म्हसकर प्रतिष्ठानच्या भव्य रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद!

६५ नामांकित कंपन्यांचा सहभाग; २,२३७ उमेदवारांची नोंदणी, ४३७ युवकांची जागेवरच निवड

रोहा प्रतिनिधी | संतोष सातपुते

रोहा येथे युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवी वाट निर्माण करण्याच्या उद्देशाने श्री. प्रमोद म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान व एकलव्य फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळावा २०२६ ला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी कालिदास हॉल, किल्ला येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत हा रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्यात तब्बल ६५ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदविला, तर विविध क्षेत्रांत रोजगाराच्या अपेक्षेने आलेल्या २,२३७ उमेदवारांनी नोंदणी केली.
रोजगार मेळाव्यातील निवड प्रक्रियेत १,२२१ उमेदवारांची दुसऱ्या फेरीसाठी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, ४३७ उमेदवारांची जागेवरच निवड झाल्याने उपस्थित युवक-युवतींच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
रोजगार मेळाव्याची ठळक वैशिष्ट्ये
६५ नामांकित कंपन्यांचा सहभाग
२,२३७ उमेदवारांची नोंदणी
१,२२१ उमेदवार दुसऱ्या फेरीसाठी पात्र
४३७ उमेदवारांची जागेवरच निवड
युवकांच्या हाताला काम आणि त्यांच्या कौशल्याला योग्य संधी मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या रोजगार मेळाव्यामुळे रोहा व परिसरातील युवकांसाठी रोजगाराची नवी दारे खुली झाली आहेत. रोजगाराच्या माध्यमातून युवकांच्या स्वप्नांना नवी दिशा देण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला.
“युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रोजगार निर्मितीचा संकल्प कायम सुरू राहणार,” असा निर्धार श्री. प्रमोद म्हसकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
मा. श्री. प्रमोदशेठ म्हसकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे युवकांना केवळ रोजगाराच्या संधीच उपलब्ध झाल्या नाहीत, तर त्यांच्या करिअरला नवी दिशा देण्याचे प्रभावी व्यासपीठही मिळाले. त्यामुळे ‘युवाशक्तीला दिशा आणि रोजगाराला चालना’ देणारा हा रोजगार मेळावा यशस्वी ठरल्याची भावना व्यक्त होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

गणेशभक्तांच्या सेवेसाठी भाजपाचा सेवाभावी पुढाकार! रोह्यात मोफत मिनीडोअर बससेवेचा शुभारंभ; रविंद्र चव्हाणांकडून अमित घाग यांच्या उपक्रमाचे कौतुक

September 11, 2026

*रोहा शहरात गणेशोत्सवानिमित्त भव्य स्वच्छता अभियान; ४२१ श्री सदस्यांच्या श्रमदानातून २७ टन कचरा संकलित*

September 11, 2026

दमखाडी नाल्याच्या दुरुस्तीला अद्याप मुहूर्त नाही! ३० जुलैच्या दुर्घटनेनंतरही काम रखडले; गणेशोत्सव तोंडावर, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

September 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

गणेशभक्तांच्या सेवेसाठी भाजपाचा सेवाभावी पुढाकार! रोह्यात मोफत मिनीडोअर बससेवेचा शुभारंभ; रविंद्र चव्हाणांकडून अमित घाग यांच्या उपक्रमाचे कौतुक

September 11, 2026

*रोहा शहरात गणेशोत्सवानिमित्त भव्य स्वच्छता अभियान; ४२१ श्री सदस्यांच्या श्रमदानातून २७ टन कचरा संकलित*

September 11, 2026

दमखाडी नाल्याच्या दुरुस्तीला अद्याप मुहूर्त नाही! ३० जुलैच्या दुर्घटनेनंतरही काम रखडले; गणेशोत्सव तोंडावर, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

September 10, 2026

रायगड जिल्ह्याची आपत्ती प्रतिसाद क्षमता बळकट करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनकडून बचाव नौका व आपत्कालीन साहित्याचे वितरण.

September 10, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us