Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गणेशभक्तांच्या सेवेसाठी भाजपाचा सेवाभावी पुढाकार! रोह्यात मोफत मिनीडोअर बससेवेचा शुभारंभ; रविंद्र चव्हाणांकडून अमित घाग यांच्या उपक्रमाचे कौतुक
  • *रोहा शहरात गणेशोत्सवानिमित्त भव्य स्वच्छता अभियान; ४२१ श्री सदस्यांच्या श्रमदानातून २७ टन कचरा संकलित*
  • दमखाडी नाल्याच्या दुरुस्तीला अद्याप मुहूर्त नाही! ३० जुलैच्या दुर्घटनेनंतरही काम रखडले; गणेशोत्सव तोंडावर, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
  • रायगड जिल्ह्याची आपत्ती प्रतिसाद क्षमता बळकट करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनकडून बचाव नौका व आपत्कालीन साहित्याचे वितरण.
  • *द.ग.तटकरे महाविद्यालयाचे वादविवादात मुंबई विद्यापीठात सुवर्ण यश.महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा रोवला तुरा *ध्रुव राऊत ठरला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट वक्ता
  • तळा शिवसेना तालुका प्रमुख प्रद्युम्नजी ठसाळ यांची फेर निवडीने शिवसैनिकात चैतन्य.
  • समाजसेवेच्या कार्याचा शिर्डीत गौरव; डॉ. फरीद चिमावकर यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गौरव’
  • निडी येथील पंकज मढवी यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली वीज वितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून हळहळ; कुटुंबीयांना मदतीसाठी प्रयत्न
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»३० ऑगस्टला रोह्यात भव्य रोजगार मेळावा; २ हजारांहून अधिक तरुणांची नोंदणी, ५० हून अधिक कंपन्यांमध्ये म्हसकर यांच्या माध्यमातून ‘ऑन द स्पॉट’ नोकरीची संधी!
ताज्या बातम्या

३० ऑगस्टला रोह्यात भव्य रोजगार मेळावा; २ हजारांहून अधिक तरुणांची नोंदणी, ५० हून अधिक कंपन्यांमध्ये म्हसकर यांच्या माध्यमातून ‘ऑन द स्पॉट’ नोकरीची संधी!

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 27, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

३० ऑगस्टला रोह्यात भव्य रोजगार मेळावा; २ हजारांहून अधिक तरुणांची नोंदणी, ५० हून अधिक कंपन्यांमध्ये म्हसकर यांच्या माध्यमातून ‘ऑन द स्पॉट’ नोकरीची संधी!

कोलाड (श्याम लोखंडे)

रायगड जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण, रोजगार सह विविध क्षेत्रात प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठानच्या पुढाकाराने रविवारी ३० ऑगस्ट रोजी रोहा किल्ला येथील ॐ नमः शिवाय कालिदास हॉल येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला बेरोजगार तरुणांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत २ हजारांहून अधिक युवा बेरोजगारांनी आपली विविध पदांसाठी अथवा हुद्द्यांसाठी नोंदणी पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, सदरच्या रोजगार मेळाव्यासाठी नामांकित ५० हून अधिक कंपन्यांनी या मेळाव्यात सहभाग निश्चित केला असून गरजूंना थेट ‘ऑन द स्पॉट’ नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार असून न भूतो ना भविष्य असा या मेळाव्याचे वैशिष्ट्य असल्याचे बे रोजगार तरुणांच्या नोंदणी संख्येवरून दिसून येत आहे.

प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठानचा बेरोजगार तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याचा हा मोठा पुढाकार समजला जात आहे तर देश विदेशातील स्थानिक पातळीवरील ५० हून अधिक नामांकित कंपन्याना एकाच छताखाली आणून आठवी उत्तीर्ण ते उच्च शिक्षित उमेदवार तसेच १८ ते ३५ वयोगटातील युवक-युवतींची या मेळाव्यात सहभागीसाठी नोंदणी केली जात आहे. होता तर विविध कंपन्यांमार्फत ऑन-द-जॉब ट्रेनिंगच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. आयटीआय, नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, तंत्रनिकेतन आदी विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध राहतील. रोहा तसेच पेण, सुधागड, म्हसळा, तळा, श्रीवर्धन आदी तालुक्यांतील बेरोजगार युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक तथा रायगडचे लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते प्रमोदशेठ अनंत म्हस्कर यांनी केले आहे.तर सदरच्या रोजगार मेळाव्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणीत उदंड प्रतिसाद लाभला आहे.आतापर्यंत तब्बल २००० पेक्षा जास्त सुशिक्षित बेरोजगार तरुणांची ऑनलाईन/ऑफलाईन नोंदणी झाली असून पात्र आणि गरजू उमेदवारांची मुलाखत घेऊन जागेवरच (On the Spot) नियुक्ती पत्र मिळण्याची संधी प्रमोद शेठ म्हसकर यांच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना लाभली आहे.तर आयोजित करण्यात आलेला रोजगार मेळावा पार पडण्यासाठी तसेच ते यशस्वी करण्यासाठी प्रमोद शेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत.

प्रतिक्रिया
सध्याच्या मंदीच्या काळात स्थानिक आणि परिसरातील तरुणांना रोजगार मिळत नसल्याने रोजगाराच्या शोधासाठी वणवण भटकावे लागू नये, म्हणून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे रोहा आणि रायगड जिल्ह्यातील त्याच बरोबर पुणे,मुंबई, ठाणे,रत्नागिरी,परिसरातील बेरोजगार असलेल्या शेकडो हातांना थेट रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. तर आतापर्यंत दोन हजाराहून अधिक बेरोजगार तरुणांनी नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह ३० ऑगस्ट रोजी वेळेवर उपस्थित राहान्याचे आवाहन केले आहे.तर प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या रोजगार मेळाव्यासाठी मोठा प्रतिसाद मिळाला असून सदरच्या रोजगार मेळाव्यात सहभागी झालेल्या युवा युवती यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे.
…..प्रमोद शेठ म्हसकर.संस्थापक अध्यक्ष प्रतिष्ठान

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

गणेशभक्तांच्या सेवेसाठी भाजपाचा सेवाभावी पुढाकार! रोह्यात मोफत मिनीडोअर बससेवेचा शुभारंभ; रविंद्र चव्हाणांकडून अमित घाग यांच्या उपक्रमाचे कौतुक

September 11, 2026

*रोहा शहरात गणेशोत्सवानिमित्त भव्य स्वच्छता अभियान; ४२१ श्री सदस्यांच्या श्रमदानातून २७ टन कचरा संकलित*

September 11, 2026

दमखाडी नाल्याच्या दुरुस्तीला अद्याप मुहूर्त नाही! ३० जुलैच्या दुर्घटनेनंतरही काम रखडले; गणेशोत्सव तोंडावर, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

September 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

गणेशभक्तांच्या सेवेसाठी भाजपाचा सेवाभावी पुढाकार! रोह्यात मोफत मिनीडोअर बससेवेचा शुभारंभ; रविंद्र चव्हाणांकडून अमित घाग यांच्या उपक्रमाचे कौतुक

September 11, 2026

*रोहा शहरात गणेशोत्सवानिमित्त भव्य स्वच्छता अभियान; ४२१ श्री सदस्यांच्या श्रमदानातून २७ टन कचरा संकलित*

September 11, 2026

दमखाडी नाल्याच्या दुरुस्तीला अद्याप मुहूर्त नाही! ३० जुलैच्या दुर्घटनेनंतरही काम रखडले; गणेशोत्सव तोंडावर, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

September 10, 2026

रायगड जिल्ह्याची आपत्ती प्रतिसाद क्षमता बळकट करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनकडून बचाव नौका व आपत्कालीन साहित्याचे वितरण.

September 10, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us