Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»शेताच्या बांधावर नाविन्यपूर्ण प्रयत्नशील शेतकऱ्यांचा तळा प्रेस क्लब कडून सन्मान !
ताज्या बातम्या

शेताच्या बांधावर नाविन्यपूर्ण प्रयत्नशील शेतकऱ्यांचा तळा प्रेस क्लब कडून सन्मान !

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 10, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

शेताच्या बांधावर नाविन्यपूर्ण प्रयत्नशील शेतकऱ्यांचा तळा प्रेस क्लब कडून सन्मान !

प्रतिनिधी / किशोर पितळे

रायगड प्रेस क्लब व तळा मराठी पत्रकार संघ वतीनेशेताच्या बांधावर प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्याची संकल्पना पत्रकार कै.संतोष पवार यांच्या प्रेरणेतून गेली १६वर्षे स्युत्य उपक्रम रायगड प्रेस क्लब राबवीत असून तळा तालुक्यातील मुंढ्याची वाडी येथील प्रकाश रामचंद्र मुंढे व कुंबेट येथील सुरेश सखाराम कजबळे याप्रयोगशील प्रगतशील शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर जावून सन्मानित करण्यात आले.शेतकऱ्यांच्या कष्टाप्रती ऋण व्यक्त करीत प्रयोगशील शेतकऱ्यांचा त्यांच्या शेतावर जाऊन सन्मान करण्याची अभिनव परंपरा रायगड जिल्हा प्रेस क्लब गेली १६ वर्षें राबवित आहे. रायगड प्रेस क्लबच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या कष्टाला, जिद्दीला आणि शेती क्षेत्रातील योगदानाला प्रोत्साहन देण्यासाठी आज दि. ९ ऑगस्ट रोजी(क्रांती दिनी)
मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.शेताच्या बांधावरच ‘आदर्श शेतकरी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचा सन्मान करण्याची ही संकल्पना केवळ पुरस्कारा पुरती मर्यादितनसून,
अन्नदाता शेतकऱ्यांच्या कष्टालासमाजा समोर मानाचे स्थान देण्याचा छोटासा प्रयत्नआहे. या प्रसंगी पंचायत समिती उपसभापती रवींद्र मांडवकर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत, सचिव कैलास पायगुडे, पोलीस निरीक्षक संतोष दराडे,रविभाऊ मुंढे,नगरसेवक रितेश मुंढे कृषी सहायक बाबर, तळा प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय रिकामे, पुरुषोत्तम मुळे, किशोर पितळे, डि टी.आंबेगावे,संध्या पिंगळे दिपक ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रात केलेले नावीन्यपूर्ण प्रयोग, निसर्गसंवर्धनासाठी केलेले कार्य आणि कृषी क्षेत्रातील योगदान समाजासमोर यावे, तसेच त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने हा शेतकरी सन्मान जिल्हा प्रेस क्लब देत असते.युवा पिढीला शेतकऱ्यांसाठी त्या प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
यावेळी मान्यवरांनी शेतकऱ्यांचे योगदान हे देशाच्या अन्नसुरक्षेचा भक्कम पाया असल्याचे सांगत, शेतीतील नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या कार्याचा सन्मान हा केवळ पुरस्कारापुरता मर्यादित नसून त्यांच्या कष्टाची समाजाकडून घेतलेली दखल असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.रायगड जिल्हा प्रेस क्लबच्या या अभिनव उपक्रमामुळे प्रगतशील शेतकऱ्यांनाप्रोत्साहन मिळत असून, शेतीकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा तरुण पिढीला मिळत आहे.शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांचा सन्मान करण्याची हीपरंपराभविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात सुरू ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी अध्यक्ष संजय रिकामे यांनी सांगितले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us