Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
  • शेताच्या बांधावर नाविन्यपूर्ण प्रयत्नशील शेतकऱ्यांचा तळा प्रेस क्लब कडून सन्मान !
  • प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या वतीने मोफत चष्मा वाटप.
  • कोलाड उड्डाण पुलावरून ट्रेलर पलटी, संरक्षण कठड्यांचे अभाव,सुदैवाने कोणतेही जीवित हानी नाही,
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा २०२६; आगरी समाज उत्कर्ष मंडळातर्फे रविवारी आयोजन
ताज्या बातम्या

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा २०२६; आगरी समाज उत्कर्ष मंडळातर्फे रविवारी आयोजन

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 8, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा २०२६; आगरी समाज उत्कर्ष मंडळातर्फे रविवारी आयोजन

प्रतिनिधी – सत्यप्रसाद आडाव

          आगरी समाज उत्कर्ष मंडळ (रजि.) यांच्या वतीने आगरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव सोहळा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत किमान ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसह समाजातील इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा या सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे.

            हा गुणगौरव सोहळा रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे ठिकाण माणेकजी गढधर म्युनिसिपल मराठी शाळा, गढधर बांध, सांताक्रुझ (प.), मुंबई – ४०० ०५४ असे आहे. आगरी समाजातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीला प्रोत्साहन देणे आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. शालांत परीक्षा २०२५-२६ मध्ये ६० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या नावाची नोंदणी प्रकाश पनवेलकर 9869986557,संजय शेडगे 9833971636, राज जोशी 9920638860, भालचंद्र पाटील 9920413124 ह्या नंबर वर  करण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले होते.

           कार्यक्रमाला आगरी समाजातील मान्यवर तसेच समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘शावरे नाच (लुंगवाले) श्री गणेश नाच मंडळ, धोंडवार’ यांचा विशेष कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

          आगरी समाज उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष नामदेव मारुती पावशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होत असून, उपाध्यक्ष जयवंत ना. पाटील, सचिव प्रकाश रा. पनवेलकर, खजिनदार अनिल ना. मोरे, उपसचिव विकास दा. पाटील, उपखजिनदार संजय ग. शेडगे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी व सल्लागार कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव आणि नव्या पिढीला शिक्षणाची प्रेरणा देणारा हा सोहळा आगरी समाजासाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026

शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!

August 10, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us