Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
  • शेताच्या बांधावर नाविन्यपूर्ण प्रयत्नशील शेतकऱ्यांचा तळा प्रेस क्लब कडून सन्मान !
  • प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या वतीने मोफत चष्मा वाटप.
  • कोलाड उड्डाण पुलावरून ट्रेलर पलटी, संरक्षण कठड्यांचे अभाव,सुदैवाने कोणतेही जीवित हानी नाही,
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीचा रायगड पोलिसांकडून पर्दाफाश; पाच गुन्ह्यांची उकल!
ताज्या बातम्या

मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीचा रायगड पोलिसांकडून पर्दाफाश; पाच गुन्ह्यांची उकल!

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 2, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीचा रायगड पोलिसांकडून पर्दाफाश; पाच गुन्ह्यांची उकल!

प्रतिनिधी /गणेश पवार 

रायगड जिल्ह्यात मोबाईल टॉवरवरील बॅटऱ्या चोरून त्यातील शिसे विकणाऱ्या सराईत टोळीचा नेरळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत रायगड आणि नवी मुंबई परिसरातील एकूण पाच चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, ४ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील दामत येथील इंडस मोबाईल टॉवरवरील अमराज कंपनीचे २४ बॅटरी सेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १५८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक ऑचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड आणि नेरळ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत वरक, पोलीस उपनिरीक्षक सुशील काजरोळकर, पोहेकॉ. एस. एम. वाघमारे, पो.कॉ. आर. बी. केकान, व्ही. आर. वांगणेकर आणि ए. बी. बेन्द्रे यांच्या पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रबीउलइस्लाम तमजुलइस्लाम शेख (वय ४५, रा. शिवडी, मुंबई) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.

पुढील तपासात आरोपीचे साथीदार सोनू, आवेस आणि चिनीदादा (रा. शिवाजीनगर, मुंबई) यांची नावे समोर आली. तसेच चोरीतील बॅटऱ्या भंगार व्यावसायिक ऋषभ धनराज जैन याला विकल्याचेही तपासात निष्पन्न झाले.
या तपासादरम्यान नेरळ, खालापूर, पेण, दादरसागरी आणि नवीन पनवेल पोलीस ठाण्यांतील एकूण पाच गुन्ह्यांची उकल करण्यात नेरळ पोलिसांना यश आले. यामध्ये रायगड जिल्ह्यातील चार आणि नवी मुंबईतील एका गुन्ह्याचा समावेश आहे.

कारवाईदरम्यान चोरीच्या १४४ बॅटऱ्या फोडून त्यामधून काढलेले १,००८ किलो वितळवलेले शिसे, ज्याची किंमत २ लाख ५२ हजार रुपये आहे, तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली इको कार (एमएच-०४-जीआर-५८७८) किंमत २ लाख रुपये, असा एकूण ४ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मोबाईल टॉवरवरील बॅटऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून सलग पाच गुन्ह्यांची उकल करण्यात नेरळ पोलिसांनी बजावलेली कामगिरी उल्लेखनीय मानली जात असून, या कारवाईमुळे अशा प्रकारच्या संघटित चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026

शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!

August 10, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us