Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रस्त्यावर साचलेल्या पाण्यात विजेचा धक्का; दोन शाळकरी मुली थोडक्यात बचावल्या! जबाबदार कोण?
ताज्या बातम्या

रस्त्यावर साचलेल्या पाण्यात विजेचा धक्का; दोन शाळकरी मुली थोडक्यात बचावल्या! जबाबदार कोण?

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 25, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रस्त्यावर साचलेल्या पाण्यात विजेचा धक्का; दोन शाळकरी मुली थोडक्यात बचावल्या! जबाबदार कोण?


प्रतिनिधी / गणेश पवार

नेरळ येथील ममदापूर ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ विद्यामंदिर हायस्कूल परिसरात शुक्रवारी २४ जुलै सकाळी साडेसातच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. समर्थनगर येथील जहरा मेनशन सोसायटीत राहणाऱ्या दोन शाळकरी मुलींना शाळेत जात असताना पाटील सर यांच्या दुकाना शेजारील रस्त्याचे बाजूला असलेला विद्युत पोल व त्या ठिकाणी रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून जाताना अचानक विजेचा धक्का बसला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे दोन्ही विद्यार्थिनींचे प्राण वाचले.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, विजेचा धक्का बसल्यानंतर दोन्ही मुली तडफडू लागल्या. त्याचवेळी जवळील अभिषेक स्टेशनरीचे संचालक अभिषेक आणि तेथे उपस्थित असलेल्या एका तरुणाने काठीच्या सहाय्याने दोघींना सुरक्षित बाहेर काढले. काही क्षणांचा विलंब झाला असता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

ही घटना शाळा सुरू होण्याच्या वेळेत घडल्याने परिसरात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. त्यामुळे आणखी एखादा अनर्थ घडला असता, अशी भीती पालकांनी व्यक्त केली.

या घटनेनंतर नागरिकांनी ममदापूर ग्रामपंचायत, नेरळ महावितरण आणि नेरळ विकास संकुल प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या चार ते पाच वर्षांत परिसरात मोठ्या प्रमाणात इमारती उभ्या राहिल्या; मात्र पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रभावी ड्रेनेज व्यवस्था उभारण्यात आलेली नाही. परिणामी दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचून नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांसह कर्जत पंचायत समितीचे सदस्य महेश खारीक पत्रकार यांनी नेरळ येथील महावितरण कार्यालयाला दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, घटनेनंतर घटनास्थळी महावितरणचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी पाहणीसाठी आला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या संदर्भात महावितरणकडून अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

घटनास्थळी उपस्थित असलेले ममदापूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गणेश बडे यांना पत्रकारांनी या भागातील पावसाळयाती सांडपाणी निचरा व गटार तसेच आपत्ती व्यवस्थेबाबत विचारणा केली असता, हे काम नेरळ विकास संकुल प्राधिकरणाच्या अखत्यारीतील आहे, असे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे, पत्रकारांनी नेरळ विकास संकुल प्राधिकरणाचे अभियंता सतीश जगताप यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या १९ मे २०२६ रोजीच्या पत्राचा संदर्भ देत संबंधित कामाची जबाबदारी ममदापूर ग्रामपंचायतीची असल्याचे सांगितले.

दोन्ही यंत्रणांकडून परस्परविरोधी भूमिका समोर येत असल्याने प्रत्यक्ष जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक सुरक्षेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयात दोन सरकारी यंत्रणा एकमेकांकडे जबाबदारी ढकलत असल्याचे चित्र समोर येत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर या घटनेची सखोल चौकशी करून रस्त्यावर विजेचा प्रवाह नेमका कशामुळे आला, त्यास जबाबदार कोण, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येणार, याबाबत रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, पावसाळ्यात अशा धोकादायक ठिकाणी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणी पालक आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us