*तळा दुर्गासागर धरण उशाला कोरड घशाला.
*धरणाकडे नगरपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष.
तळा-किशोर पितळे-तळे येथे १९७३ साला दरम्यान तळ्याचे सुपुत्र तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री सी डी देशमुख यांच्या हस्ते दुर्गाबाई देशमुख यांच्या नावाने दुर्गासागर धरणाचे भूमीपुजन करण्यात येऊन १९७४/७५ सालात घरोघरी पाणी पोहोचवून पिण्याच्या पाण्याच्या असणाऱ्या दुर्भिक्षा पासून काहिसा दिलासा मिळाला.नागरिक सुखावले गेले पाण्याच्या दुर्भिक्षामुळे गाव सोडून गेलेले परत घराकडे परतले जवळ पास ५० वर्षानी धरणाच्या पाण्याने तळ गाठला.कोरडे पडले मासे पाण्या विना तडफडून मेले.प्रतिवर्षापेक्षा यंदा पाण्याची भूगर्भातील पातळी कमी झाली झाल्याने संपूर्ण राज्यात पाण्याची टंचाई चे संकट ओढावले शहरातील हे धरण कोरडे पडले या धरणाच्या पाण्याचा वापर वडाची वाडी,कुंभार आळी पुसाटी वाडी, पुष्पवाटीका वरचा मोहल्ला समर्थनगर अशा भागात केला जातो.प्रतिवर्षी या भागात मार्च ते जून या चार महिन्यात पाणी टंचाईला सामोरे लागते धरणा जवळील बोअरवेलमधूनहोणाऱ्या पाणीपुरवठा पाण्याची पातळी खाली गेल्या ने अधिक झळ बसत आहे.हे नगरपंचायत प्रशासनाला याची पुर्ण जाणीव असूनही अर्थसंकल्पात धरणाच्या गाळ काढण्याची आर्थिक तरतूद केली जात नाही.किंवा इतर फंडाची व्यवस्था केली नाही मात्र मोदी तलाव सुशोभीकरणासाठी ३० लक्ष रु.निधी उपलब्ध करून काय साध्य केले हे करण्याऐवजी धरणाच्या गाळ काढण्यासाठी केला असता तर अधिक चांगले झाले असते गेल्या पन्नास वर्षात केले नसल्याने धरणाची खोली कमी झाल्याने पाणी साठा कमी होत आहे.
धरण उशाला कोरड घशाला.अशीच म्हणण्याची पाळी तळेकरांवर आली आहे धरणाचा गाळ काढूनसभोवताली अर्धे वाँल कंपाऊंड व तारेचे संरक्षण असेल तर पुढील काळात पाणी टंचाई कमी होईल हे विकास काम नाही का?असा संतप्त सूर उमटत आहे. स्मशान शेड,स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता हा काय विकास झाला का? अशी संतप्त प्रतिक्रिया शहरातून उमटत आहे.


