*तळा येथील वैभव राणे याची भारतीय सैनीक (मिलिटरी) दलात निवड.
*युवा पिढीपुढे ठेवला आदर्श .
तळा -किशोर पितळे
तळा तालुक्यातील राणेचीवाडी येथील वैभव जागृती जयेंद्र राणे याची भारतीय सैनिक मिलिटरीत निवड झाली त्याचे शिवसेना पक्षाच्या वतीने शाल श्रीफळ, भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला. व पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी शहरप्रमुख राकेश वडके जिल्हा कोअर कमिटी सदस्य लिलाधर खातू नगरसेवक नरेश सुर्वे रितेश मुंढे,सिराज खाचे , माजी नगरसेवक भास्कर गोळे माजी सरपंच तथा शिवसैनिक नमीत पांढरकामे,महैश सुतार अँड. चेतन चव्हाण ग्रामस्थ,भगीनी आदी उपस्थित होते. वैभवने ग्रँच्युऐशनचेशिक्षण पुर्ण केले हेकरीतअसताना मनातील ईच्छा पुर्ण करण्यासाठी घडपड होता हा २१ वर्षाचा असून त्याला लहानपणा पासूनच जीवनात काही तरी वेगळे करण्याची घडपड होती अगदी इयत्ता ७ वी पासूनच पोलीस किंवा मिलिटरीत भारत मातेची सेवा करण्यासाठी ईच्छा उराशी बाळगून प्रयत्न करीत राहीला.ते वयाच्या २१ व्या वर्षीच पूर्ण केले.स्पोर्ट्सची आवड होती शिक्षण पूर्ण झाल्यावर ६ महिने “ज्ञानेश्वरी अकादमी” दहिवडी सातारा आणि त्याआधी १ वर्ष मुंबई ला ट्रेनिंग केली. आणी पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले वडिलांनी मुलांच्या ईच्छा प्रमाणे आर्थिक मदत पुरवली तीन बहीणी हा एकटा असून आई वडील यांनी काळजाचा दगड करून भारत देशाच्या संरक्षणासाठी मुलगा प्रयत्न करीत असल्याने परवानगी देतवैभवच्या पंखात बळ मिळेल.वैभव आवश्यक असणाऱ्या प्राथमिक परिक्षा टेस्ट यशस्वी होत भारतीय सेवेत रुजूहोतआहे. आता हैदराबाद येथे ६ महीने कमांडो ट्रेनिंग पुर्णकरून पोस्टींग होणार आहे.इंडीयन आर्मीतील चमकता सितारा असून त्याचा तालुक्यासह राणेचीवाडी ग्रामस्थांना राणे कुटुंबियांना सार्थ अभिमान वाटतो.आमच्या प्रतिनिधीनी संपर्क साधला असता वैभव म्हणाला कि जीवनात उच्च शिक्षण महत्त्वाचे आहे. त्याबरोबर करिअर कसे घडवायचे आपल्या हातात असते.ईच्छे प्रमाणे धेय्य उद्धिष्ट जोपासले कि मार्ग सापडतो.जिध्द,चिकाटी, मेहनत आत्मबळाच्या जोरावर अशक्य अशी गोष्ट करू शकतो. उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर, बिल्डिंग व्यवसायीक आय टी इंजिनिअर, कोण पण होऊ शकतो “आकाशी झेप घेरे पाखरा”याउक्तीप्रमाणे भारतीय प्रशासकीय सेवेचा अधिकारी किंवा भारतीय सैन्य भरतीसाठी प्रत्येक युवा पिढीने भारत मातेच्या संरक्षणासाठी पुढे यावे असे आवाहन मनोगतातून व्यक्त केले.