Author: संपादक कुणाल मनोज घोसाळकर

सिडकोचा ऐतिहासिक निर्णय: बंगलो/रो-हाऊस प्लॉटवरील बहुनिवासी इमारतींना मोठा दिलासा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश पनवेल / नवी मुंबई (प्रतिनिधी) बंगलो व रो-हाऊस प्लॉटवर उभारलेल्या बहुनिवासी इमारतींच्या नियमितीकरणाचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला असून, सिडकोच्या संचालक मंडळाने (दि. १२ मार्च २०२६) महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नवी मुंबईतील शेकडो गृहनिर्माण सोसायट्यांमधील हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. सदर प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. परवानग्या रद्द होणे, हस्तांतरण प्रक्रियेतील अडथळे, तसेच मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासात निर्माण झालेल्या अडचणींमुळे नागरिक त्रस्त होते. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडको प्रशासन व शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करून…

Read More

कोलाड आंबेवाडी येथे सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशीच्या वतीने श्री राम नवमी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात,रामनवमीनिमित्त शोभायात्रा कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील कोलाड आंबेवाडी नाक्यावर रामनवमीनिमित्त सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशीच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली.तर प्रभू श्री रामाच्या रामनवमी निमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात तसेच मोठ्या उत्साहात पार पडले. आंबेवाडी कोलाड येथील श्री अंबर सावत मंदिर सभागृहात हिंदू संमेलनाचे देखील आयोजन करण्यात आले होते. आंबेवाडी कोलाड बाजारपेठेतून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत राम भक्तांच्या मोठ्या प्रमाणावर सहभागाने संपूर्ण बाजारपेठेतील वातावरण भगवेमय आणि भक्तिमय झाले होते. सकल हिंदू समाज कोलाड आंबेवाडी पंचक्रोशी राम भक्तांकडून रामनवमी उत्सवाचे हे आयोजन करण्यात आले होते. या…

Read More

धाटाव औद्योगिक क्षेत्रात ‘योगा’ची नवी ऊर्जा : DMCC कंपनीत आरोग्यदायी उपक्रम उत्साहात रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते धाटाव औद्योगिक क्षेत्रात सध्या कामाच्या धकाधकीत कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असताना, DMCC केमिकल कंपनीने एक सकारात्मक पाऊल उचलत योगा, मेडिटेशन आणि फिटनेस प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले. २८ मार्च रोजी कंपनीच्या परिसरात पार पडलेला हा उपक्रम उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. या शिबिरासाठी अनुभवी योग प्रशिक्षक विभा चोरगे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी कामगारांना योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व पटवून देत, ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा आणि शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. सोप्या आणि प्रभावी योग पद्धतींमुळे उपस्थित कामगारांनी मोठ्या…

Read More

एसआयआर अभियानाच्या पनवेल विधानसभा प्रमुखपदी परेश ठाकूर यांची नियुक्ती पनवेल (प्रतिनिधी) भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहीच्या अधिकृत पत्राद्वारे महाराष्ट्रात सुरू होणाऱ्या मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियानासाठी भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशतर्फे १८८ – पनवेल विधानसभा क्षेत्राचा BLA-१ (विधानसभा प्रमुख) म्हणून पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद व प्रेरणादायी बाब आहे. त्यांच्या नेतृत्वातून संघटन अधिक बळकट होऊन कार्याला नवी गती मिळेल, असा विश्वास आहे असे म्हणत आमदार प्रशांत ठाकूर यांनी नगरसेवक परेश ठाकूर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडूनही परेश ठाकूर यांचे अभिनंदन होत…

Read More

वार्तालाप कार्यक्रमात राजिप अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी शेअर केले व्हिजन पनवेल तालुका पत्रकार विकास मंचासोबत वार्तालाप कार्यक्रमाचे केले होते आयोजन जिल्ह्यातील एकही अंगणवाडी अंधारात राहणार नाही… — राजिप अध्यक्ष, मंगेश वाकडीकर पनवेल / प्रतिनिधी पनवेल मधील सक्रिय पत्रकारांची नोंदणीकृत संस्था असणाऱ्या पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने रविवार दिनांक २९ मार्च रोजी रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या समवेत वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंचातील तमाम सदस्यांनी मंगेश वाकडीकर यांचा यावेळी सत्कार करून त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मंगेश वाकडीकर यांनी अत्यंत विस्तृतपणे त्यांची कार्यपद्धती आणि व्हिजन हे मंचातील सदस्यांसमवेत शेअर केले. दोन दिवसांपूर्वी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत देखील मंगेश…

Read More

मनमिळावू स्वभावाच्या अनिता सुर्वे काळाच्या पडद्याआड ; परिसरात शोळकळा प्रतिनिधी – शुभ्रा आडाव न्हावे रेवदंडा परिसरातील सर्वांच्या मनात आपलेपणाचे स्थान निर्माण करणाऱ्या कै. अनिता अनंत सुर्वे यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान रामनवमीच्या पावन दिवशी, गुरुवार दि. २६ मार्च रोजी जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शांत, संयमी आणि मनमिळावू स्वभावामुळे कै. सुर्वे या सर्वांच्या विशेष जिव्हाळ्याच्या होत्या. कोणालाही मदतीची गरज भासली की तत्परतेने पुढे सरसावणे, प्रत्येकाशी आत्मीयतेने संवाद साधणे आणि नातेसंबंध जपण्याची त्यांची वृत्ती यामुळे त्यांनी समाजात वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या साधेपणातही माणुसकीची…

Read More

आमदार निरंजन डावखरे यांचा पुढाकार: शाळांना डिजिटल साधनांचे व साहित्याचे वितरण . तळा -किशोर पितळे -आ.निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून तळा तालुक्यातील गो.म.वेदक माध्यमिक विद्यामंदिर,कन्या शाळा यांना डिजिटल आणि शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले यामध्ये संगणक, प्रिंटर, प्रोजेक्टर आणि शिक्षणासाठी आवश्यक डिजिटल वस्तूंचा समावेश होता यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष ॲड.निलेश रातवडकर यांनी सांगितले कि आ.निरंजन डावखरे हे महाराष्ट्र विधानपरिषदेत निवडून आलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. आ.निरंजन‌ डावखरे यांच्या माध्यमातून डिजिटल साहित्य शाळांमध्ये उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने शिकण्यास प्रोत्साहनमिळेल.शहरीभागाप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत डिजिटल साधने पोहोचल्याने शिक्षणात समावेशकता आणि समान संधीची भावना वाढण्यास मदत होणार असल्याने तळा तालुक्याचे वतीने…

Read More

कंत्राटी ते कायम: जनरल मजदूर सभेच्या लढ्याला मोठं यश, बेक केमिकल्समध्ये १८ कामगारांना कायम दर्जा प्रतिनिधी – सत्यप्रसाद आडाव चणेरा कंत्राटी कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या जनरल मजदूर सभेच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून बेक केमिकल्स कंपनीतील १८ कंत्राटी कामगारांना कायम कामगारांचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. या निर्णयामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनरल मजदूर सभा आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात झालेल्या करारानुसार या कामगारांना टप्प्याटप्प्याने कायम सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत यापूर्वी ६ कामगारांना कंपनीच्या थेट रोलवर कायम करण्यात आले होते. आता नुकतेच आणखी ६ कामगारांना कायम दर्जा देण्यात आला असून त्यांना अधिकृत नियुक्तीपत्रांचे…

Read More

श्रीवर्धन विधानसभा BLA-1 प्रमुखपदी अमित घाग रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) भारतीय जनता पक्षाच्या मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियानाच्या पार्श्वभूमीवर १९३-श्रीवर्धन विधानसभा क्षेत्रासाठी BLA-1 (विधानसभा प्रमुख) पदावर रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने ही नियुक्ती जाहीर करण्यात आली असून, जिल्हाध्यक्ष तथा खासदार धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अमित घाग यांच्या नियुक्तीमुळे मतदार पुनर्निरीक्षण अभियानाला गती मिळणार असून, बूथस्तरावर मतदार नोंदणी व संपर्क वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर हे अभियान यशस्वी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे श्रीवर्धन विधानसभा क्षेत्रात भाजप संघटन अधिक मजबूत होणार असल्याची…

Read More

रायगड नाभिक तरुण संघाची नवी कार्यकारिणी जाहीर; पदनियुक्ती सोहळा उत्साहात रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते) रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाच्या नव्याने निवडलेल्या कार्यकारिणीचा पदनियुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष सुदाम बाबू शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विश्वस्तांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या सोहळ्यात दिनेश मोरे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी आदेश बुरुणकर (दक्षिण विभाग), भगवान निमुतकर (मध्य विभाग) आणि विनोद पवार (उत्तर विभाग) यांची निवड झाली. मुख्य सचिवपदी सुरेंद्र पालांडे यांची निवड करण्यात आली असून सहसचिवपदी सचिन दिवेकर (दक्षिण), विजय भोसले (मध्य) आणि जयेश मोरे (उत्तर) यांची नियुक्ती करण्यात आली. कोषाध्यक्षपदी योगेश शिर्के, हिशोब तपासनीसपदी नितीन बडे तर सह…

Read More