Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»अधिक मासानिमित्त रोहा येथे सुरू असलेल्या कीर्तन-प्रवचन मालिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद
ताज्या बातम्या

अधिक मासानिमित्त रोहा येथे सुरू असलेल्या कीर्तन-प्रवचन मालिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 29, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

अधिक मासानिमित्त रोहा येथे सुरू असलेल्या कीर्तन-प्रवचन मालिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

अधिक मासाचे औचित्य साधून रोहा येथील श्री दुर्गादेवी मंदिरात भजनी मंडळ, अभंग सेवा भजनी मंडळ आणि संस्कार भारती रोहा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ३० दिवसीय कीर्तन-प्रवचन मालिकेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दररोज सायंकाळी आयोजित करण्यात येणाऱ्या या धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमातून समाजप्रबोधन, अध्यात्म आणि संस्कारांचे महत्त्व प्रभावीपणे मांडले जात आहे.

दि. २५ मे २०२६ रोजी नितीन प्रधान यांनी ५१ शक्तीपीठ, दुर्गा सप्तशती, सिंधू मानकर अनुभव, देव्या कवच पाठ १००, देवी सूक्त, गुरुचरित्र आणि श्रीसूक्त यांसारख्या विषयांवर सखोल विवेचन केले. मध्यंतरात श्रीराम जप, वर्तमान आणि माता या विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले.

दि. २६ मे रोजी सौ. छाया गोखले यांनी “स्त्री जन्म म्हणुनी न व्हावे उदास” या विषयावर प्रभावी कीर्तन सादर करून महिलांच्या जीवनातील संघर्ष, आत्मविश्वास आणि अध्यात्मिक शक्ती यावर भाष्य केले.

दि. २७ मे रोजी ह.भ.प. अंजली कवळे यांनी “व्यर्थ न हा नर देह मनुजा” या विषयावर समाजप्रबोधनपर कीर्तन केले. तसेच संत दामाजी पंत आणि बेदरपूर बादशाह यांच्या चरित्रातून भक्ती, मानवता आणि सेवाभाव यांचे महत्त्व अधोरेखित केले.

दि. २८ मे रोजी सौ. आशाताई वागळे यांनी “कलावती आई”, “ॐ पूर्णमिदम्” तसेच त्रिदंड संन्यास, शांतता, स्वच्छता, शिस्त, कौपीन, दंड, कमंडलू, शक्तिपात आणि कृष्ण प्रताप या विविध आध्यात्मिक विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रवचनातून वैदिक संस्कृती आणि सनातन परंपरेचे महत्त्व उलगडून सांगण्यात आले.

दि. २९ मे रोजी आरती धारप यांनी ज्येष्ठ साहित्यिक कवी कुसुमाग्रज यांच्या जीवनचरित्रावर आधारित प्रवचन सादर केले. साहित्य आणि धर्माच्या माध्यमातून समाजात जनजागृती कशी घडवून आणता येते, याचे प्रभावी विवेचन त्यांनी केले.

या धार्मिक मालिकेमुळे रोहा परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, दररोज मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून कीर्तन व प्रवचनांचा लाभ घेत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us