Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»एसटी बसची सेवा कोलमंडली कोलाड नाक्यावर तासंतास प्रवासी ताटकळत उभे,परिवहन खात्याचा भोंगळ कारभाला जबाबदार कोण?
ताज्या बातम्या

एसटी बसची सेवा कोलमंडली कोलाड नाक्यावर तासंतास प्रवासी ताटकळत उभे,परिवहन खात्याचा भोंगळ कारभाला जबाबदार कोण?

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 18, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

एसटी बसची सेवा कोलमंडली कोलाड नाक्यावर तासंतास प्रवासी ताटकळत उभे,परिवहन खात्याचा भोंगळ कारभाला जबाबदार कोण?

कोलाड (श्याम लोखंडे) में महिना सुट्यांचा दिवस सारेच इकडून तिकडून प्रवास करणारे प्रवासी असतात त्यात इंधन पेट्रोल टंचाई निर्माण झाली आहे तसेच इंधन बचतीचा नारा केन्द्र सरकार सह राज्य सरकारने देखील दिला असून त्याचे पालन करा असे आवाहन तथा नारा राज्याचे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री यांनी दिला मात्र त्यात सर्व सामान्य जनतेची मोठी कसरत पणाला लागली असून चक्क मार्गावरून नित्यनेम सेवा देणारी लालपरी एसटी बसचा तुटवडा निर्माण झाल्याने तिची सेवाच कोलमंडली असल्याचे समजते त्यामुळे सर्व सामान्य प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाला तासंतास डोळे लावून तिची प्रतिक्षा प्रवासी स्थानकावर करावी लागत असल्याने कोलाड नाक्यावर तासंतास प्रवासी ताटकळत उभेच त्यामुळे परिवहन खात्याचा भोंगळ कारभाला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल
सर्वत्र व्यक्त होत आहे.

गेली अनेक वर्षे मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू आहे त्यात कोलाड आंबेवाडी नाक्यावरील उड्डाण पुलाचे देखिल काम सुरू असल्याने मोठी वाहतूक कोंडी देखील निर्माण होत आहे. शालेय सुट्टी लागल्याने परगावी राहत असलेले नागरिक गावाकडे ये जा करत असतात.त्यात कोकणचा केंद्र बिंदू म्हणून या मार्गावरील कोलाड आंबेवाडी नाक्याची ओळख आहे. असंख्ये प्रवासी येथून विविध ठिकाणी प्रवास करत असतात मात्र याच ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाला तासंतास बसची प्रतीक्षा करावी लागत आहे रत्नागिरी,चिपळूण, श्रीवर्धन माणगाव कडून येणाऱ्या एसटी बस ह्या फुल भरून येत असल्याने त्या उभ्या देखील राहत नाहीत जर राहिल्या तर दूरवर त्यात इतर वाहने येत असल्याने या प्रवाश्यांना धावाधाव करावी लागते तोवर ती बस निघून जाते त्यामुळे प्रवासी वर्गात एकच संताप उडत आहे. इतर खाजगी वाहनांचा प्रवासी दर वाढल्याने ते सर्व सामान्य नागरिक तथा लाडक्या बहिणींना न परवडणारे झाले आहे. तसेच या ठिकाणी परिवहन खात्याचे कोणीही वाहक कंट्रोल अधिकारी नसल्यामुले येथील प्रवासी वर्गाला वेळेवर सेवा मिळत नसल्याचे बोलले जात आहे. त्यात बसचा तुटवडा झाला आहे का असाच सवाल आता प्रवासी वर्गातून उपस्थित होत आहे

सकाळ पासून सायंकाळ रात्री उशिरा पर्यंत प्रवासी येथून प्रवास करत असतात तसेच त्यात उन्हाचा तडाखा उष्म्याने अंगाची लाही लाही होत आहे. त्यात त्यांचा प्रवास वेळेवर होत नसल्याने अधिक ताण सर्व सामान्य नागरिक तसेच कामगार चाकरमानी यांच्या मनावर होत आहे.कोलाड नाक्यावर तासंतास ताटकळत उभे बस आली रे आली की एकच झुंबड मुंबईकडे जाणाऱ्या साऱ्या बस फुल भरून जात असल्याने या ठिकाणी बस सेवेची प्रवासी वर्गाला मोठी कमतरता भासत आहे.शुक्रवार,शनिवार,रविवार, आणि सोमवारी तर अक्षरशः मोठी प्रवाशांची गर्दी होत असल्याने ऐन वेळी एसटीची बसची पुरेशी सेवा मिळत नसल्याने येथील प्रवासी वर्गातून एकच संताप व्यक्त होत असताना दिसून येत आहे.

प्रतिक्रिया
उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामामुळे अतिरिक्त प्रवासी वर्गात वाढ झाली असून बसची सेवा ही अपुरी पडत असून रत्नागिरी चिपळूण महाड माणगाव कडून येणाऱ्या तसेच मुंबईकडून माणगाव महाड कडे जाणाऱ्या फुल भरून या बस जात आहेत त्यामुळे कोलाड आंबेवाडी नाक्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाची कुचंबना होत आहे. त्यांना ताटकळत उभे रहावे लागत आहे.यासाठी प्रशासनाने तसेच परिवहन विभागाने जादा बस सेवा सुरू कराव्या बस संख्येत वाढ झाली तर प्रवासी वर्गाला अधिक वेळ ताटकळत उभे रहावे लागणार नाही तसेच त्यांचा प्रवास वेळेवर आणि सुखरूप होईल यासाठी सदरील परिवहन विभागाने याकडे लक्ष केंद्रित करून सध्या इंधन बचतीत भर पडेल तसेच या ठिकाणी परिवहन विभागाने आपले अधिकारी प्रवासी वर्गाला नित्यनेम सेवा देण्यासाठी त्यांची या ठिकाणी नेमणूक करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे.
… डॉ. मंगेश सानप सामाजिक कार्यकर्ते .

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us