Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»पनवेलमध्ये ‘युवा शक्ती जागर’ यात्रेला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; कृष्णराज महाडिक यांचा कार्यकर्त्यांशी थेट संवाद
ताज्या बातम्या

पनवेलमध्ये ‘युवा शक्ती जागर’ यात्रेला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; कृष्णराज महाडिक यांचा कार्यकर्त्यांशी थेट संवाद

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 23, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

पनवेलमध्ये ‘युवा शक्ती जागर’ यात्रेला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; कृष्णराज महाडिक यांचा कार्यकर्त्यांशी थेट संवाद

पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित ‘युवा शक्ती जागर’ यात्रेच्या निमित्ताने पनवेलमध्ये तरुणाईचा महाकुंभ पाहायला मिळाला. या यात्रेचे नेतृत्व करत असलेले भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी पनवेलमधील मार्केटयार्ड येथील बैठकीत बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, नगरसेवक परेश ठाकूर आणि परिवाराच्या कार्याचा गौरव केला. “ठाकूर परिवाराने प्रगत आणि पावन केलेली ही भूमी म्हणजे पनवेल आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला आदर व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी अतिशय नम्र भूमिका घेत सांगितले की, “मी आज प्रदेशाध्यक्ष असलो तरी तुमच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. मला तुमच्याकडूनही खूप काही शिकायचे आहे. आपण सर्वांनी मिळून युवा मोर्चाचे एक मजबूत संघटन उभे करूया. तरुणांनी विविध क्षेत्रांत काम करण्याचे धाडस दाखवले पाहिजे आणि मी तुमच्यासोबत प्रदेशाध्यक्ष म्हणून नाही, तर एक मित्र म्हणून सदैव पाठीशी उभा राहीन. अशी ग्वाही त्यांनी दिली

            मंगळवार २१ एप्रिल रोजी ही यात्रा पनवेलमध्ये दाखल झाली. यात्रेचे स्वागत गार्डन हॉटेलपासून काढण्यात आलेल्या एका भव्य बाईक रॅलीने करण्यात आले, ज्यामध्ये शेकडो तरुण उत्साहाने सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ हॉल येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विशेष संवाद मेळावा पार पडला, ज्यामध्ये आगामी काळातील संघटनात्मक बांधणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या दौऱ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे वडाळे तलाव येथे आयोजित केलेला ‘मीट-अप विथ के. एम.’ हा कार्यक्रम. या विशेष सत्रात कृष्णराज महाडिक यांनी तरुण पिढी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससोबत थेट संवाद साधला, ज्यामुळे तरुणांमध्ये एक वेगळीच ऊर्जा पाहायला मिळाली. संपूर्ण जागर यात्रेच्या माध्यमातून युवकांना संघटित करून त्यांच्यामध्ये नवीन राजकीय आणि सामाजिक चेतना निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता युवा मोर्चाकडून यशस्वीपणे करण्यात आला. या यात्रेला उत्तर रायगडमधील युवकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभल्याने पनवेलमध्ये भाजपची मोठी ताकद दिसून आली. या वेळी पनवेल महापालि’
केचे माजी सभागृहनेते तथा नगरसेवक परेश ठाकूर, नगरसेवक अजय बहिरा, जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्च्याचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आनंद ढवळे, शहर उपाध्यक्ष केदार भगत, अमित ओझे, तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील, रोहित जगताप, युवा मोर्च्याचे नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष मयूर कदम, पनवेल शहर मंडळ अध्यक्ष हिमेश बहिरा,  निखील जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us