Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रोहा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी कोलाडच्या सपना वाघमारेची उच्च शिक्षणासाठी यूकेमधील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड
  • रोहा आगारातील कर्मचाऱ्यांसाठी मनोहर शेठ देसाई यांची थंड पाण्याचा कूलर ची भेट
  • बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये
  • रा.ग .पोटफोडे विद्यालयाचा निकाल ८४.०९% टक्के,८८% गुण कु. अधिकारी ईश्वरी सुरेश वर्गात सर्व प्रथम,
  • उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन
  • तळा तालुक्यात गारासह वादळी पावसाने घेतला युवकाचा बळी
  • सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमोद शेठ म्हसकर यांच्याकडून किल्ला येथील नितेश मुंढे यांना मदतीचा आधार
  • तळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर संपन्न.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»मुरुडच्या सामाजिक-राजकीय क्षेत्रातील आधारस्तंभ हरपला; कै. सुरेशआप्पा शंकर पाटील यांचे निधन
ताज्या बातम्या

मुरुडच्या सामाजिक-राजकीय क्षेत्रातील आधारस्तंभ हरपला; कै. सुरेशआप्पा शंकर पाटील यांचे निधन

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 8, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Screenshot
Share
WhatsApp Facebook Twitter

मुरुडच्या सामाजिक-राजकीय क्षेत्रातील आधारस्तंभ हरपला; कै. सुरेशआप्पा शंकर पाटील यांचे निधन

प्रतिनिधी – सत्यप्रसाद आडाव, चणेरा

मुरुड तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक तथा सामाजिक-राजकीय क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्त्व कै. सुरेशआप्पा शंकर पाटील (वय ७८) यांचे आज दुपारी सुमारे १:३० वाजता त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मुरुड स्मशान भुमीत रात्री ११:०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने मुरुड तालुक्यावर शोककळा पसरली असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुरेशआप्पा पाटील यांनी आपल्या आयुष्यभर सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. ते मुरुड भंडारी समाजाचे माजी अध्यक्ष होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुरुड तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. मुरुड नगरपरिषदेमध्ये शिक्षण उपसभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या कार्यकाळात शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले.
व्यावसायिक क्षेत्रातही त्यांनी ‘पाटील खानावळ’च्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या प्रामाणिकपणा, साधेपणा आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे मुरुड परिसरात त्यांना विशेष मान-सन्मान लाभला होता. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते नेहमी तत्पर असत, त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व लोकांच्या मनात घर करून राहिले.
त्यांचे कुटुंबही मोठे व एकसंघ आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, चार भाऊ, तीन बहिणी तसेच पुतणे-पुतण्या, भाचे-भाच्या, जावई, सुना असा ५० हून अधिक सदस्यांचा मोठा परिवार आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबातील चार भाऊ आजही एकत्र कुटुंब पद्धतीने राहत होते, ही बाब आजच्या काळात विशेष उल्लेखनीय मानली जाते.
सुरेशआप्पा पाटील हे माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांचे दिर होते, तसेच नगरसेवक विजय नाना पाटील यांचे ते भाऊ होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. विविध क्षेत्रातील व्यक्तींनी अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांच्या निधनाने एक कर्तृत्ववान, प्रामाणिक आणि समाजहिताची जाणीव असलेले नेतृत्व हरपले आहे. मुरुडच्या सामाजिक-राजकीय क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेली पोकळी भरून न निघणारी असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोहा आगारातील कर्मचाऱ्यांसाठी मनोहर शेठ देसाई यांची थंड पाण्याचा कूलर ची भेट

May 12, 2026

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये

May 12, 2026

उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन

May 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

रोहा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी कोलाडच्या सपना वाघमारेची उच्च शिक्षणासाठी यूकेमधील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड

May 14, 2026

रोहा आगारातील कर्मचाऱ्यांसाठी मनोहर शेठ देसाई यांची थंड पाण्याचा कूलर ची भेट

May 12, 2026

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये

May 12, 2026

रा.ग .पोटफोडे विद्यालयाचा निकाल ८४.०९% टक्के,८८% गुण कु. अधिकारी ईश्वरी सुरेश वर्गात सर्व प्रथम,

May 11, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us