Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा.विज्ञान लँब चे थाटात उद्घाटन.
  • मंत्री भरतशेठ गोगावले यांची रायगड पालकमंत्री निवड होताच कोलाड मध्ये शिवसैनिकांचा जल्लोष फटाके फोडून साजरा केला आनंदोत्सव
  • मुरुडच्या कौस्तुभ आरेकर याचा स्वातंत्र्यदिनी विशेष सत्कार
  • नांदगावच्या आयुष हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा
  • रायगडचे पालक मंत्री भरतशेट गोगावले झाल्याने शिवसेना वतीने तळा येथे आनंदोत्सव साजरा.
  • *नदीत केमिकलयुक्त द्रव्य सोडल्याने खळबळ; सोलमवाडी ग्रामस्थांची तक्रार, तहसील प्रशासनाकडून चौकशीची शक्यता*
  • खांब ज्ञानांकुर इंग्लीश स्कूल मध्ये ८० वा स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा.
  • लेझीमच्या तालावर दुमदुमला एम. डी. एन. इंटरनॅशनल स्कूलचा स्वातंत्र्यदिन सोहळा; देशभक्तीने भारावले वातावरण
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»*नदीत केमिकलयुक्त द्रव्य सोडल्याने खळबळ; सोलमवाडी ग्रामस्थांची तक्रार, तहसील प्रशासनाकडून चौकशीची शक्यता*
ताज्या बातम्या

*नदीत केमिकलयुक्त द्रव्य सोडल्याने खळबळ; सोलमवाडी ग्रामस्थांची तक्रार, तहसील प्रशासनाकडून चौकशीची शक्यता*

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 17, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*नदीत केमिकलयुक्त द्रव्य सोडल्याने खळबळ; सोलमवाडी ग्रामस्थांची तक्रार, तहसील प्रशासनाकडून चौकशीची शक्यता*

रोहा:समीर बामुगडे

तळा : तळा तालुक्यातील सोलमवाडी परिसरातील नदीलगत केमिकलयुक्त द्रव्य सोडून पर्यावरण प्रदूषित केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सोलमवाडी ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळाने तळा तहसील प्रशासनाकडे तक्रार करून संबंधित ठिकाणी तातडीने पाहणी व चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास MH-10-CR-9253 आणि MH-23-W-3106 क्रमांकाचे केमिकलयुक्त द्रव्याने भरलेले ट्रक निगुडशेत रोडवरील वाशी व निगुडशेत हद्दीतील नदीलगतच्या परिसरात आणून उभे करण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यानंतर संबंधित ठिकाणी केमिकलयुक्त द्रव्य सोडण्यात आल्याने ते नदीच्या पाण्यात मिसळले असून पाण्याला तीव्र दुर्गंधी येत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकारामुळे नदीतील मासे, जलचर, पशुपक्षी तसेच परिसरातील जैवविविधतेला धोका निर्माण झाल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, याच नदी परिसरात सोलमवाडी गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी असलेली बोरवेल व सार्वजनिक हँडपंप आहे. त्यामुळे रासायनिक द्रव्यामुळे भूजल व पिण्याचे पाणी दूषित होण्याची शक्यता असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत तळा तहसील कार्यालयाकडून संबंधित ठिकाणी पाहणी, चौकशी तसेच आवश्यक असल्यास पाण्याचे नमुने घेऊन अहवाल मागविण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती आहे. प्रशासनाच्या अहवालानंतर प्रदूषणाचे स्वरूप आणि त्यासाठी जबाबदार व्यक्ती निश्चित होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस प्रशासनही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत संबंधितांवर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तक्रारीसोबत फोटो, व्हिडिओ व इतर उपलब्ध पुरावेही सादर करण्यात आले आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा.विज्ञान लँब चे थाटात उद्घाटन.

August 17, 2026

मंत्री भरतशेठ गोगावले यांची रायगड पालकमंत्री निवड होताच कोलाड मध्ये शिवसैनिकांचा जल्लोष फटाके फोडून साजरा केला आनंदोत्सव

August 17, 2026

मुरुडच्या कौस्तुभ आरेकर याचा स्वातंत्र्यदिनी विशेष सत्कार

August 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

रायगड जिल्हा परिषद उर्दू शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा.विज्ञान लँब चे थाटात उद्घाटन.

August 17, 2026

मंत्री भरतशेठ गोगावले यांची रायगड पालकमंत्री निवड होताच कोलाड मध्ये शिवसैनिकांचा जल्लोष फटाके फोडून साजरा केला आनंदोत्सव

August 17, 2026

मुरुडच्या कौस्तुभ आरेकर याचा स्वातंत्र्यदिनी विशेष सत्कार

August 17, 2026

नांदगावच्या आयुष हॉस्पिटलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा

August 17, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us