Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त “शिवराय ते भीमराय समता मार्च २०२६” चे आयोजन
ताज्या बातम्या

चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त “शिवराय ते भीमराय समता मार्च २०२६” चे आयोजन

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 18, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त

“शिवराय ते भीमराय समता मार्च २०२६” चे आयोजन

(प्रतिनिधी )शैलेश पालकर पोलादपूर-रायगड

महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाला यावर्षी ९९ वर्षे पूर्ण होत असून शताब्दी वर्षात प्रवेश करत आहे. तसेच १९ व २० मार्च १९२७ रोजी गाडीतळ, महाड येथे झालेल्या ऐतिहासिक परिषदेलाही शंभर वर्षांचा टप्पा गाठण्याचा हा प्रारंभ आहे. या ऐतिहासिक स्मृतींना अभिवादन करण्यासाठी “शिवराय ते भीमराय समता मार्च २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, स्वाभिमान आणि न्यायाच्या विचारांचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी हा समता मार्च १७ ते २० मार्च २०२६ दरम्यान किल्ले रायगड ते चवदार तळे, महाड असा आयोजित करण्यात येणार आहे. मागील आठ वर्षांपासून सातत्याने हा मार्च आयोजित केला जात असून यावर्षी त्याचे ९ वे वर्ष आहे.
या मार्च अंतर्गत १७ मार्च रोजी पाचाड येथे मुक्काम, १८ मार्च रोजी रायगड दर्शन व समता मार्च प्रारंभ, तसेच सायंकाळी समता इफ्तार आयोजित करण्यात येणार आहे. १९ मार्च रोजी महाडमध्ये समता रॅली आयोजित करण्यात येईल. दुपारी ३ वाजता समता मार्च छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू होऊन क्रांतीस्तंभ -चवदार तळे बाजारपेठ मार्गे भगवानदास बेकरी मागील गाडीतळ येथे पोहोचेल.
याच ऐतिहासिक स्थळी, जिथे १९२७ साली परिषद झाली होती, तेथे सायंकाळी ५ वाजल्यापासून सभा व चळवळीतील गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. २० मार्च रोजी महाड येथे समता सत्याग्रह परिषद व नियोजन बैठक आयोजित केली आहे.

या कार्यक्रमास चवदार तळे सत्याग्रह आणि ऐतिहासिक परिषदेच्या आयोजनातील दलित व दलितेतर सहकाऱ्यांचे वंशज विशेष उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेत महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी, साहित्यिक व माजी आयएएस अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, आणि परिवर्तनवादी लेखिका प्रज्ञा दया पवार हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.

समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा संदेश देणाऱ्या या ऐतिहासिक कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समता मार्च संयोजन समिती, महाड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us