Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
  • शेताच्या बांधावर नाविन्यपूर्ण प्रयत्नशील शेतकऱ्यांचा तळा प्रेस क्लब कडून सन्मान !
  • प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या वतीने मोफत चष्मा वाटप.
  • कोलाड उड्डाण पुलावरून ट्रेलर पलटी, संरक्षण कठड्यांचे अभाव,सुदैवाने कोणतेही जीवित हानी नाही,
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»ग्राहकांच्या संयमाचा अंत पाहणार का? चिखल, दुर्गंधी आणि पावसात भारत गॅस एजन्सीसमोर नागरिकांची परवड; प्रशासनाकडून कारवाईचे संकेत
ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संयमाचा अंत पाहणार का? चिखल, दुर्गंधी आणि पावसात भारत गॅस एजन्सीसमोर नागरिकांची परवड; प्रशासनाकडून कारवाईचे संकेत

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 23, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

ग्राहकांच्या संयमाचा अंत पाहणार का?
चिखल, दुर्गंधी आणि पावसात भारत गॅस एजन्सीसमोर नागरिकांची परवड; प्रशासनाकडून कारवाईचे संकेत

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

रोहा शहरासह परिसरातील अनेक गावांमधून भारत गॅस एजन्सीच्या सेवेसाठी येणाऱ्या ग्राहकांना सध्या अक्षरशः हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर एजन्सी परिसरात निर्माण झालेल्या चिखल, अस्वच्छता आणि अपुऱ्या सुविधांमुळे ग्राहकांच्या संयमाची परीक्षा पाहिली जात असल्याचे चित्र समोर आले आहे.
दैनंदिन जीवनासाठी अत्यावश्यक असलेल्या गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना लांबलचक रांगा लावाव्या लागत आहेत. मात्र एजन्सी परिसरातील चिखलमय रस्ते, साचलेले पाणी आणि दुर्गंधीयुक्त वातावरणामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. अनेकांना नाकावर रुमाल धरून तासन्‌तास उभे राहण्याची वेळ येत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
एजन्सीच्या मागील बाजूस पसरलेल्या घाणीमुळे परिसराचे आरोग्यदायी वातावरण बिघडले असून, पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. “गॅस घेण्यासाठी आलो की त्रास हमखास ठरलेलाच,” अशी संतप्त प्रतिक्रिया काही ग्राहकांनी दिली.
ग्राहकांच्या मते, गॅस वितरणासारख्या अत्यावश्यक सेवेसाठी येणाऱ्या नागरिकांना किमान स्वच्छ व सुरक्षित परिसर, पावसापासून संरक्षणासाठी निवारा शेड, बसण्याची व्यवस्था आणि चिखलमुक्त मार्ग उपलब्ध करून देणे ही एजन्सीची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती याच्या नेमकी उलट असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, या गंभीर बाबीची दखल घेत तालुका पुरवठा अधिकारी हेमलता कुरसुगे यांनी संबंधित एजन्सीला ग्राहकांची गैरसोय होणार नाही यासाठी आवश्यक सूचना दिल्या जाणार असल्याचे सांगितले. परिसराची स्वच्छता, पावसाळ्यातील संरक्षणासाठी शेड उभारणे तसेच ग्राहकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत एजन्सीला निर्देश देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
यामुळे आता संबंधित एजन्सी आणि जबाबदार यंत्रणा प्रत्यक्षात किती तत्परता दाखवतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अन्यथा वाढत्या गैरसोयीमुळे ग्राहकांच्या नाराजीचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांच्या सुविधेसाठी सुरू असलेल्या सेवाच जर त्रासदायक ठरत असतील, तर त्याकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना करणे काळाची गरज बनली आहे.
“ग्राहकांना सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि सुलभ सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे; त्यासाठी संबंधितांनी त्वरित पावले उचलावीत,” अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026

शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!

August 10, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us