Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»राजकारण»भाजप स्थापना दिनानिमित्त पनवेलमध्ये जल्लोष; कार्यकर्त्यांचा सेवा व निष्ठेचा संकल्प कायम
राजकारण

भाजप स्थापना दिनानिमित्त पनवेलमध्ये जल्लोष; कार्यकर्त्यांचा सेवा व निष्ठेचा संकल्प कायम

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 6, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

  भाजप स्थापना दिनानिमित्त पनवेलमध्ये जल्लोष; कार्यकर्त्यांचा सेवा व निष्ठेचा संकल्प कायम

पनवेल (प्रतिनिधी) जगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आज ( दि. ०६ एप्रिल) पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. १९८० साली स्थापन झालेल्या या पक्षाने गेल्या अनेक दशकांत देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, सुशासनासाठी आणि जनकल्याणासाठी सातत्याने कार्य केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात पक्ष ध्वजारोहणाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला यसेच पक्षाच्या संस्थापकांचे आणि देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या नेत्यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. या प्रसंगी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विचारसरणीप्रती निष्ठा राखण्याचा आणि समाजसेवेचा संकल्प पुन्हा दृढ केला. यावेळी पेढे एकमेकांना वाटून स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस चारुशिला घरत यांनी आपल्या भाषणात भारतीय जनता पार्टी च्या प्रवासाचा आढावा घेतला आणि पक्षाने देशाच्या विकासात बजावलेली भूमिका अधोरेखित केली. भारतीय जनता पार्टी चा स्थापना दिवस हा केवळ एक औपचारिक सोहळा नसून, कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा, निष्ठा आणि सेवा भावनेचा नवा संकल्प करण्याचा दिवस आहे. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी काळात अधिक जोमाने कार्य करण्याचे, संघटन बळकट करण्याचे आणि शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. तसेच प्रितम म्हात्रे यांनी आजपासून सात दिवस ‘रोजगार सप्ताह’ आयोजित करण्यात आल्याचे सांगून या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी दिली जाणार असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाला पनवेल पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, पनवेल महापालिकेच्या महिला व बाल कल्याण सभापती ममता म्हात्रे, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा नगरसेविका रुचिता लोंढे, प्रीती जॉर्ज, श्वेता भोईर, माजी नगरसेवक सुनील बहिरा, प्रभाकर बहिरा, माजी नगरसेविका नीता माळी, अनुराधा ठोकळ, सारिका भगत, नलिनी शेलार, सुलोचना कल्याणकर, सुहासिनी शिवणेकर, सपना पाटील, लीना पाटील, शहर सरचिटणीस अमित ओझे, केदार भगत, रुपक्ष नागवेकर, निलेश म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्थापना दिनानिमित्त आपल्या घरांवर पक्षध्वज फडकावले असून पक्ष कार्यालयांना आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सेवादल आळी सन्मित्र मंडळातर्फे मोफत शरीर तपासणी व आरोग्य मार्गदर्शन शिबिर

September 27, 2026

वैज्ञानिक माहितीचा विविध विभागांनी प्रभावीपणे उपयोग करावा–जिल्हाधिकारी किशन जावळे केंद्रीय भूजल मंडळातर्फे अहवाल सादरीकरण व माहिती प्रसार कार्यशाळा संपन्न

September 24, 2026

रोहा तालुक्यात २९ सप्टेंबरला दोन ठिकाणी रोजगार मेळावे युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; रोशन चाफेकर यांचे आवाहन

September 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us