Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रोहा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी कोलाडच्या सपना वाघमारेची उच्च शिक्षणासाठी यूकेमधील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड
  • रोहा आगारातील कर्मचाऱ्यांसाठी मनोहर शेठ देसाई यांची थंड पाण्याचा कूलर ची भेट
  • बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये
  • रा.ग .पोटफोडे विद्यालयाचा निकाल ८४.०९% टक्के,८८% गुण कु. अधिकारी ईश्वरी सुरेश वर्गात सर्व प्रथम,
  • उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन
  • तळा तालुक्यात गारासह वादळी पावसाने घेतला युवकाचा बळी
  • सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमोद शेठ म्हसकर यांच्याकडून किल्ला येथील नितेश मुंढे यांना मदतीचा आधार
  • तळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर संपन्न.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»राज्य»मोहाफुले साठी आग लावणे पडले महागात *सावली वनपरिक्षेत्रात आग लावणाऱ्या एका महिलेसह इतर दोघांवर वनगुन्हा दाखल.*
राज्य

मोहाफुले साठी आग लावणे पडले महागात *सावली वनपरिक्षेत्रात आग लावणाऱ्या एका महिलेसह इतर दोघांवर वनगुन्हा दाखल.*

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 31, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Screenshot
Share
WhatsApp Facebook Twitter

मोहाफुले साठी आग लावणे पडले महागात

*सावली वनपरिक्षेत्रात आग लावणाऱ्या एका महिलेसह इतर दोघांवर वनगुन्हा दाखल.*
जिल्हा प्रतिनिधी विशांत लोखंडे
सावली:30/3/2026: सावली वनपरिक्षेत्रातील उपवनक्षेत्र व्याहाड, नियतक्षेत्र सिरसी मधील कक्ष क्रमांक 1534 (संरक्षित वन) मध्ये मोहा फुले वेचण्याच्या निमित्ताने आग लावणाऱ्या मौजा लोंढोली येथील 1. सौ वनमाला मोरेश्वर घोंगडे व 39 वर्ष, 2. उमेश नरेंद्र घोंगडे वय 25 वर्ष, 3. भूपेंद्र नीलकंठ खोबे वय 25 वर्ष या तिघांविरुद्ध वनविभागाने वन गुन्हा दाखल केला.

वने ही राष्ट्रीय संपत्ती असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वनांचे संरक्षण व संवर्धन करणे काळाची गरज आहे. वने आहे तर जीवन आहे. वने संपुष्टात आले तर पृथ्वीवरील संपूर्ण अन्नसाखळी बिघडेल व पर्यावरणाचा समतोल ढासळेल आणि पृथ्वीवरील संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात येईल, पर्यायाने नामशेष होईल. ऑक्सिजन,पाणी, अन्न व वस्त्र ह्या मानवाच्या मूलभूत गरजा मिळणे अशक्य होईल. वनाचे इतके सारे महत्त्व असतानाही, शासन स्तरावर विविध उपक्रमाचे माध्यमातून जनजागृती केली जात असतानाही कृत्रिम वनवा लावणे नित्याचीच बाब झाली आहे.
दिनांक 28 3/2026 रोजी वनरक्षक शिरसी हे आपल्या पीआरटी समूह जंगलगस्त करीत असताना वरील तीनही आरोपी जंगलात आग लावून पळून जात असताना वन कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले. कार्यवाही शिवाय या अमानुष प्रवृत्तीला आळा बसणे शक्य नाही म्हणून वरील तीनही आरोपीविरुद्ध वन गुन्हा क्रमांक 204/232854/2026 दिनांक 28 3/2026 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 33 (ड) नुसार 2 वर्षापर्यंत कैद व आगीत सजीव सृष्टीची फार मोठी हानी झाल्यामुळे वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9 व 39 अन्वये 3 वर्ष ते 7 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे.
सदर प्रकरणी राजन तलमले विभागीय वनाधिकारी चंद्रपूर, विकास तरसे सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांचे नेतृत्वात मारुती पुल्लेवाड क्षेत्र सहाय्यक व्याहाड पुढील तपास करीत आहे. सदर प्रकरणाचे चौकशी दरम्यान महादेव मुंडे वनरक्षक सिरसी, एकनाथ खुडे वनरक्षक गायडोंगरी, श्री डांगे वनरक्षक उपरी, सुषमा मेश्राम वनरक्षक नवेगाव तसेच पीआरटी चमू व बीट मदतनीस शिरशी यांनी मुलाचे सहकार्य केलेत.
*आग लावणाऱ्याचे नाव सांगितल्यास माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल व त्यांना रोख 10000 नगदी स्वरूपात बक्षीस देण्यात येईल. वनाचे महत्त्व लक्षात घेऊन शेतावरील पाळे- धुरे जाळताना मोहाचे झाडाखाली जाळताना जंगलाला आग लागणार नाही, याची दक्षता घेऊन नागरिकांनी पर्यावरण संवर्धनास सहकार्य करावे* असे आव्हान वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोहा रेल्वे स्थानकाची दमदार झेप; उत्पन्नात २१% वाढ, प्रवाशांचा वाढता ओघ!

May 2, 2026

महाराष्ट्राच्या विकासाचा माईलस्टोन मुंबई – पुणे मिसिंग लिंक !

April 27, 2026

शिक्षण सेवकांचा कॅन्डलमार्च मौन ,जिल्ह्यातील तीनशेहून अधिक शिक्षण सेवकांची उपस्थिती विविध शिक्षक संघटनाचा सहभाग,शांततेत श्रद्धांजली अर्पण.

April 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

रोहा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी कोलाडच्या सपना वाघमारेची उच्च शिक्षणासाठी यूकेमधील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड

May 14, 2026

रोहा आगारातील कर्मचाऱ्यांसाठी मनोहर शेठ देसाई यांची थंड पाण्याचा कूलर ची भेट

May 12, 2026

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये

May 12, 2026

रा.ग .पोटफोडे विद्यालयाचा निकाल ८४.०९% टक्के,८८% गुण कु. अधिकारी ईश्वरी सुरेश वर्गात सर्व प्रथम,

May 11, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us