चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
कोलाड (श्याम लोखंडे)
रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथे धाक्सुद क्रीडा मंडळ यांच्या वतीने श्री साखरचौथ गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदाचा १० वा गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सर्व गणेशभक्तांच्या श्रद्धेचे व आस्थेचे स्थान असलेल्या श्री साखरचौथ गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी गावातील ग्रामस्थ महीला माता भगिनी भाविकांची मोठ्या श्रद्धेने पूजा आरती भक्ती भावाने दर्शन घेतले.
सालाबादप्रमाणे यंदाही धाक्सुद क्रीडा मंडळ व चिल्हे ग्रामस्थ महीला मंडळाच्या वतीने जुनी परंपरा रूढी नाच गाणी भजन विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे होते. मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी श्रींची स्थापना करण्यात आली.यावेळी संपूर्ण गाव परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
गणेशोत्सवानिमित्त युवकांचे स्पूर्तिस्थान आ.अनिकेत तटकरे, समाजसेवक प्रमोद शेठ म्हसकर सह खांब कोलाड परिसरातील विविध मान्यवरांनी मंडळाला भेट देऊन श्री साखरचौथ गणपती बाप्पांचे दर्शन घेत युवक मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. मंडळाच्या वतीने मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन यथोचित या प्रसंगी स्वागत करण्यात आले.
गणपती उत्सव काळानंतर साखर सार्व.साखरचौथ गणेश उत्सव या मंडळाच्या वतीने गेली दहा वर्ष साजरा केला जात आहे या मंदिर परिसर आणि गणपती सजावट विविध रंगी बेरंगी फुलांनी आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे .श्री गणेशपूजा व आरती, महाआरती, भजन व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच बालगोपाळांसाठी विविध विशेष उपक्रम मंडळाच्या वतीने आयोजित आयोजित करण्यात आले.तसेच हा उत्सव यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत.