Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गणेशभक्तांच्या सेवेसाठी भाजपाचा सेवाभावी पुढाकार! रोह्यात मोफत मिनीडोअर बससेवेचा शुभारंभ; रविंद्र चव्हाणांकडून अमित घाग यांच्या उपक्रमाचे कौतुक
  • *रोहा शहरात गणेशोत्सवानिमित्त भव्य स्वच्छता अभियान; ४२१ श्री सदस्यांच्या श्रमदानातून २७ टन कचरा संकलित*
  • दमखाडी नाल्याच्या दुरुस्तीला अद्याप मुहूर्त नाही! ३० जुलैच्या दुर्घटनेनंतरही काम रखडले; गणेशोत्सव तोंडावर, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
  • रायगड जिल्ह्याची आपत्ती प्रतिसाद क्षमता बळकट करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनकडून बचाव नौका व आपत्कालीन साहित्याचे वितरण.
  • *द.ग.तटकरे महाविद्यालयाचे वादविवादात मुंबई विद्यापीठात सुवर्ण यश.महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा रोवला तुरा *ध्रुव राऊत ठरला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट वक्ता
  • तळा शिवसेना तालुका प्रमुख प्रद्युम्नजी ठसाळ यांची फेर निवडीने शिवसैनिकात चैतन्य.
  • समाजसेवेच्या कार्याचा शिर्डीत गौरव; डॉ. फरीद चिमावकर यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गौरव’
  • निडी येथील पंकज मढवी यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली वीज वितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून हळहळ; कुटुंबीयांना मदतीसाठी प्रयत्न
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»समाजातील सर्व घटक सबल झाले तरच समाज सबल होतो : शिकल्यानंतर समाज सुदृढ बनतो : ज्ञानभास्कर ष.ब्र.१०८ श्रीगुरु महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांचे प्रतिपादन.
ताज्या बातम्या

समाजातील सर्व घटक सबल झाले तरच समाज सबल होतो : शिकल्यानंतर समाज सुदृढ बनतो : ज्ञानभास्कर ष.ब्र.१०८ श्रीगुरु महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांचे प्रतिपादन.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरSeptember 2, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

समाजातील सर्व घटक सबल झाले तरच समाज सबल होतो :
शिकल्यानंतर समाज सुदृढ बनतो :
ज्ञानभास्कर ष.ब्र.१०८ श्रीगुरु महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांचे प्रतिपादन.

कोलाड (श्याम लोखंडे)

विद्यार्थी घडले पाहीजेत. शिकले पाहीजे उच्च दर्जाचे चांगले शिक्षण मुलांना मिळाले पाहिजे. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना दिशा दाखविल्यास शिक्षण चांगले होते.चांगले शिक्षण दिल्यास मुलांचे आदर्श जीवन बनते.शिक्षणाबरोबर धर्म, संस्कृतीचे शिक्षण दिले पाहिजे. गुणगौरव कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्यास विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळते. समाजातील सर्व घटक सबल झाले तरच समाज सबल होतो. शिकल्यानंतर समाज सुदृढ बनतो असे ज्ञान भास्कर किर्तनरत्न ष.ब्र.१०८ श्रीगुरु महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांनी आपल्या आशीर्वाचनातून व्यक्त करत मला मिळालेला पुरस्कार सगळ्या सदभक्तांचा पुरस्कार असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास नगराध्यक्षा वनश्री शेडगे, पंचक्रोशी जंगम समाज अध्यक्ष प्रकाश जंगम, रायगड जिल्हा जंगम समाज अध्यक्ष लक्ष्मण जंगम, रोहा सुधागड जंगम समाज अध्यक्ष सुनील जंगम, पंचक्रोशी जंगम समाज महिला मंडळ अध्यक्ष प्रिया जंगम, पंचक्रोशी जंगम समाज उपाध्यक्ष रघुनाथ जंगम, सचिव प्रमोद जंगम, रूपेश जंगम, खजिनदार राजेंद्र जंगम, राहुल ज़गम, समन्वयक किरण जंगम, वीरेंद्र जंगम, सल्लागार काशिनाथ जंगम, मनोहर जंगम, अरुण जंगम, सागर जंगम, प्रकाश जंगम, मारुती जंगम सदानंद जंगम आदी उपस्थित होते
यावेळी नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांनी प्रत्येक समाज पुढे जात आहे.समाजाचे आपण देणे लागत असल्याने समाजाचे ऋण फेडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या यशात पालकांचा व शिक्षकांचे श्रेय असते. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळेल पाहीजे.सतत शिकत रहा बुध्दीला चालना मिळेल असे सांगितले.

तसेच लक्ष्मण जंगम यांनी पंचकोशी जंगम समाज विविध उपक्रम राबवत आहे. पंचक्रोशीत शिवपाठ चालू केले आहे.
प्रकाश जंगम यांनी पंचक्रोशी जंगम समाजाच्या वतीने विविध उपक्रम आम्ही राबवणार असून लक्ष्मणस्वामी जंगम, मनोहरस्वामी जंगम व सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून समाजासाठी काम करणार असल्याचे सांगितले.यावेळी समाजाच्या वतीने ज्ञानभास्कर ष.ब्र.१०८ श्रीगुरु महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यासह विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

या कार्यक्रमात सुनील जंगम, प्रिया जंगम, महादेव सरसंबे, प्रगती जंगम, विशाखा जंगम,नीरज सरसंबे, यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण जंगम यांनी सूत्रसंचालन व आभार वीरेंद्र जंगम यांनी मानले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

गणेशभक्तांच्या सेवेसाठी भाजपाचा सेवाभावी पुढाकार! रोह्यात मोफत मिनीडोअर बससेवेचा शुभारंभ; रविंद्र चव्हाणांकडून अमित घाग यांच्या उपक्रमाचे कौतुक

September 11, 2026

*रोहा शहरात गणेशोत्सवानिमित्त भव्य स्वच्छता अभियान; ४२१ श्री सदस्यांच्या श्रमदानातून २७ टन कचरा संकलित*

September 11, 2026

दमखाडी नाल्याच्या दुरुस्तीला अद्याप मुहूर्त नाही! ३० जुलैच्या दुर्घटनेनंतरही काम रखडले; गणेशोत्सव तोंडावर, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

September 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

गणेशभक्तांच्या सेवेसाठी भाजपाचा सेवाभावी पुढाकार! रोह्यात मोफत मिनीडोअर बससेवेचा शुभारंभ; रविंद्र चव्हाणांकडून अमित घाग यांच्या उपक्रमाचे कौतुक

September 11, 2026

*रोहा शहरात गणेशोत्सवानिमित्त भव्य स्वच्छता अभियान; ४२१ श्री सदस्यांच्या श्रमदानातून २७ टन कचरा संकलित*

September 11, 2026

दमखाडी नाल्याच्या दुरुस्तीला अद्याप मुहूर्त नाही! ३० जुलैच्या दुर्घटनेनंतरही काम रखडले; गणेशोत्सव तोंडावर, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

September 10, 2026

रायगड जिल्ह्याची आपत्ती प्रतिसाद क्षमता बळकट करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनकडून बचाव नौका व आपत्कालीन साहित्याचे वितरण.

September 10, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us