*दैवज्ञ ब्राह्मण समाज तळे वतीने कै. नाना शंकरशेठ १६१वी पुण्यतिथी व विद्यार्थ्यांना ग्रामर पुस्तके व पेन वाटप. *रायगड जिल्हा परिषद तळे मराठी शाळा येथे स्तुत्य उपक्रम.
*दैवज्ञ ब्राह्मण समाज तळे वतीने कै. नाना शंकरशेठ १६१वी पुण्यतिथी व विद्यार्थ्यांना ग्रामर पुस्तके व पेन वाटप.
*रायगड जिल्हा परिषद तळे मराठी शाळा येथे स्तुत्य उपक्रम.
प्रतिनिधी /किशोर पितळे
मुंबईचे शिल्पकार तथा राष्ट्रभुषण दैवज्ञ ब्राह्मण समाज भुषण कै.नाना शंकरशेठ याची १६१वी सोहळा ५आँगस्ट २६ रोजी रा.जि.प मराठी शाळा येथे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी नवनीत इंग्रजी गोल्डन ग्रामर पुस्तके व पेन चे वाटप करण्यात आले. प्रथम कै.नाना शंकरशेठ यांच्या पवित्र प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलन करून भावपूर्ण आदरांजली वाहिली. यावेळी व्यासपीठावर समाजाचे अध्यक्ष सुहास वावेकर सर,पत्रकार किशोर पितळे, सुनील पितळे दिलीप वेदक,मितल वावेकर, स्मिता पितळे मुख्याध्यापिका सुप्रिया जामकर उपस्थित होते.यावेळी किशोर पितळे यांनी इतिहास जागृत करून कै नाना शंकरशेठ यांचे बहुसमाजासाठी दिलेले योगदान मोठे आहे.नाना शंकर शेठ श्रीमंत होते ब्रिटिश सरकारला आर्थिक मदत केली मुंबईत दळणवळण साधने सुरू केली त्यात रेल्वे आणली बोरीबंदर ते ठाणे १८५३साली सुरु करून दळणवळण सुरू केले स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, मुरबाड जिल्हा ठाणे येथे वैतरणा धरण,पवई तानसा धरण बांधून पाण्याची सोय केली आरोग्य सेवा, हाँस्पिटल पायाभरणी केली लाईट,दिवाबत्ती सोय,भूमीगत गटारे, शिक्षणाची सोय मुलींना आपल्या च गिरगाव मधील जागेत पहिली शाळासुरूकेली इंग्रजी व संस्कृत भाषा पंडीत होते नितांत प्रेम होते संस्कृत भाषेत पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना लागू केली कै.नानांनी अनेक समाजोपयोगी सुविधा निर्माण केल्या.देशाचा आर्थिक कणा मुंबईला महाराष्ट्राची राजधानी बनवली म्हणूनच त्यांना मुंबई चा शिल्पकार संबोधले जाते. त्यांच्या इतिहासाची पाने उलगडून स्मृती जागृत केल्या.अध्यक्ष सुहास वावेकर सर यांनी दैवज्ञ समाजाकडून गेली दहा वर्षे पुण्यतिथी साजरी करीत आहोत नानाच्या समाज कार्याची माहिती व्हावी प्रेरणा व आदर्श घ्यावा या उदात्त हेतूने प्राथमिक शाळेत साजरी करीत असतो.कै नानांचे कार्य महान आहे कार्याचा मागोवा विषद करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी समाजज्ञाती भगीनी ग्रीष्मा वेदक (अमेरिका )यांनी नवनीत गोल्डन इंग्रजी ग्रामर पुस्तके समाजातील दिलेल्या दानशूर व्यक्तीनी शिक्षणा साठी दिलेले योगदान प्रेरणादायी असून अशाउपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता निश्चितच वाढेल त्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा असे आवाहन करून पुस्तकाचे वाटप व पेन बिस्कीट खाऊ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापिका सुप्रिया जामकर,सहशिक्षिका मितल वावेकर, राजू थिटेकर, निकम, बाबर ,देवरे सर, विद्यार्थी पालक उपस्थित होते.