Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
  • रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.
  • युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
  • सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण
  • *रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*
  • *नागोठणे पोलीस स्टेशनचे अमलदार लांगी दांपत्याच्या सुपुत्राचा वाढदिवस आश्रमशाळेत, विद्यार्थ्यांना वह्या-पेन व अन्नदान*
  • *आधार कार्ड बनवताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीने भोगावा लागतोय त्रास. *शाळेचा दाखल ग्राह्य धरावा जनतेची मागणी.
  • फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»रोह्यातील अर्णव सलागरेची राष्ट्रीय स्तरावर झेप राष्ट्रीय गणित स्पर्धा २०२६ मध्ये २०० पैकी २०० गुणांसह प्रथम क्रमांक
शैक्षणिक

रोह्यातील अर्णव सलागरेची राष्ट्रीय स्तरावर झेप राष्ट्रीय गणित स्पर्धा २०२६ मध्ये २०० पैकी २०० गुणांसह प्रथम क्रमांक

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 23, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोह्यातील अर्णव सलागरेची राष्ट्रीय स्तरावर झेप
राष्ट्रीय गणित स्पर्धा २०२६ मध्ये २०० पैकी २०० गुणांसह प्रथम क्रमांक

रोहा प्रतिनिधी – संतोष सातपुते

रोहा येथील ग्रेगोरियन पब्लिक स्कूलच्या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्याने अर्णव अमर सलागरे यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिव्हाळा उद्योग समूह आयोजित व स्मार्ट अकॅडमी, अहिल्यानगर यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गणित स्पर्धा २०२६ मध्ये त्यांनी देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
दि. ३१ मे २०२६ रोजी झालेल्या या स्पर्धेत अर्णवने उत्कृष्ट कामगिरी करत २०० पैकी २०० गुण मिळवत शंभर टक्के यश संपादन केले. या यशामुळे रोहा तालुका, रायगड जिल्हा तसेच महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल झाले आहे.
अर्णव सलागरे हा केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर विविध उपक्रमांमध्येही सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणारा अष्टपैलू विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. अबॅकस स्पर्धांमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर त्याने उल्लेखनीय यश मिळवले असून सर्व स्तरांवरील अबॅकस परीक्षा त्याने यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत.
क्रीडा क्षेत्रातही त्याने बुद्धिबळ, नेटबॉल, कबड्डी, हँडबॉल आणि धावणे अशा विविध स्पर्धांमध्ये तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. कराटे क्षेत्रात ज्युनिअर ब्लॅक बेल्ट प्राप्त करून अलीकडेच झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत त्याने राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे.
शाळेने त्याच्या सर्वांगीण प्रगतीची दखल घेत त्याची मुख्य विद्यार्थी प्रतिनिधी (हेड बॉय) म्हणून निवड केली आहे. शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा कौशल्य, शिस्त आणि नेतृत्वगुण यांचा उत्कृष्ट संगम असलेला विद्यार्थी म्हणून अर्णवचे सर्वत्र कौतुक होत आहे.
त्याच्या या यशामागे सातत्यपूर्ण मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन असल्याचे मानले जात आहे. या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून भविष्यात तो आणखी मोठी झेप घेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अर्णव अमर सलागरे याचे मनःपूर्वक अभिनंदन व उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.

June 28, 2026

भविष्यातील स्पर्धा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे ही काळाची गरज” – आमदार अनिकेत तटकरे

June 27, 2026

खा. सुनील तटकरे यांच्यामार्फत पोलादपूर तालुक्यातील दूर्गम डोंगराळ गावापर्यंत विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न-आ.अनिकेत तटकरे पोलादपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप

June 22, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026

सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण

June 28, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us