Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
  • शेताच्या बांधावर नाविन्यपूर्ण प्रयत्नशील शेतकऱ्यांचा तळा प्रेस क्लब कडून सन्मान !
  • प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या वतीने मोफत चष्मा वाटप.
  • कोलाड उड्डाण पुलावरून ट्रेलर पलटी, संरक्षण कठड्यांचे अभाव,सुदैवाने कोणतेही जीवित हानी नाही,
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»रोहा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी कोलाडच्या सपना वाघमारेची उच्च शिक्षणासाठी यूकेमधील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड
शैक्षणिक

रोहा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी कोलाडच्या सपना वाघमारेची उच्च शिक्षणासाठी यूकेमधील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 14, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोहा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी
कोलाडच्या सपना वाघमारेची उच्च शिक्षणासाठी यूकेमधील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड

रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोलाड येथील आदिवासी विद्यार्थिनी कु. सपना राजेश वाघमारे हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उच्च शिक्षणासाठी थेट यूकेमधील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड मिळवून मोठे यश संपादन केले आहे. तिची निवड युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स तसेच क्वीन मेरी युनिव्हर्सिटी, यूके येथे झाली आहे.
आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ग्लोबल स्कॉलरशिप प्रोग्रॅम अंतर्गत हे यश मिळाले आहे. कु. सपना ही अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग, ठाणे यांच्या अधिपत्याखालील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव अंतर्गत आदिवासी मुलींच्या शासकीय वस्तीगृह, हडपसर पुणे येथे शिक्षण घेत आहे.
कातकरी समाजातील आणि अत्यंत दुर्गम भागातील असलेल्या सपनाने आर्थिक अडचणी व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश मिळविले आहे. मोलमजुरी करून मुलीला शिक्षण देणाऱ्या तिच्या पालकांसाठी तसेच संपूर्ण आदिवासी विकास विभागासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. मुलीने जागतिक स्तरावर शिक्षणासाठी झेप घेतल्याने कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
माननीय प्रकल्प अधिकारी श्री. प्रदीप देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गृहपाल अर्चना पवार यांच्या सहकार्याने आणि एकलव्य फाउंडेशनमार्फत मिळालेल्या शैक्षणिक मार्गदर्शनामुळे सपनाने परदेशात उच्च शिक्षण घेण्याचा निर्धार केला आणि तो यशस्वी करून दाखविला.
कु. सपना वाघमारे हिचे हे यश आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थीदेखील जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर मोठी स्वप्ने पूर्ण करू शकतात, हे तिने सिद्ध करून दाखविले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

*दैवज्ञ ब्राह्मण समाज तळे वतीने कै. नाना शंकरशेठ १६१वी पुण्यतिथी व विद्यार्थ्यांना ग्रामर पुस्तके व पेन वाटप. *रायगड जिल्हा परिषद तळे मराठी शाळा येथे स्तुत्य उपक्रम.

August 7, 2026

लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला – आमदार रविशेठ पाटील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन

August 6, 2026

कै. नारायण पांडुरंग गोरे गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांकडुन शैक्षणिक साहित्य व छत्री वाटप

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026

शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!

August 10, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us