Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»रोह्यातील डॉ. सी. डी. देशमुख विद्यालयाची कोकण परिक्षेत्रात तृतीय क्रमांकाची दमदार कामगिरी
शैक्षणिक

रोह्यातील डॉ. सी. डी. देशमुख विद्यालयाची कोकण परिक्षेत्रात तृतीय क्रमांकाची दमदार कामगिरी

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 3, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोह्यातील डॉ. सी. डी. देशमुख विद्यालयाची कोकण परिक्षेत्रात तृतीय क्रमांकाची दमदार कामगिरी

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

महाराष्ट्र राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येणाऱ्या ‘स्टुडंट पोलीस कॅडेट’ (SPC) कार्यक्रमांतर्गत कोकण परिक्षेत्र स्तरावर तृतीय क्रमांक पटकावत रोहा नगर परिषदेच्या डॉ. सी. डी. देशमुख माध्यमिक विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यालयाचा विशेष बहुमान करण्यात आला.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पोलीस मुख्यालय, अलिबाग येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. अदिती तटकरे यांच्या हस्ते विद्यालयाला सन्मानित करण्यात आले. या वेळी विद्यालयाच्या स्टुडंट पोलीस कॅडेट प्रमुख समीर म्हात्रे यांचाही मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या यशाबद्दल बोलताना समीर म्हात्रे सर यांनी सांगितले की, “हा सन्मान केवळ माझा किंवा विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा नसून तो एक सामूहिक प्रयत्नांचा परिपाक आहे.” त्यांनी रोहा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा कुमारी वनश्री समीर शेडगे, शिक्षण सभापती रवींद्र चाळके, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी अजयकुमार एडके तसेच शाळा समिती सदस्य, शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. स्मिता गुरव तसेच शिक्षक व शिक्षकेतर वर्ग यांचे वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शन व पाठबळाचे विशेष आभार मानले.
पुढे ते म्हणाले की, सहकार्यपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणामुळेच विद्यालयाने कोकण विभागात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. पोलीस अधीक्षक रायगड-अलिबाग आचल दलाल, जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप झेमसे यांच्या विशेष मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना शिस्त व सुरक्षेचे प्रभावी धडे मिळाले.
या सोहळ्यास जिल्हाधिकारी डॉ. किरण जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या यशाबद्दल रोहा शहर व परिसरातून विद्यालय आणि विद्यार्थी टीमचे सर्वत्र कौतुक होत असून पालक, विद्यार्थी व शिक्षणप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

२० वर्षांच्या ज्ञानसेवेचा गौरव; रोठ खुर्दच्या शिक्षिका अमिता बामणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

September 5, 2026

युवाशक्तीला रोजगाराची दिशा; प्रमोद म्हसकर प्रतिष्ठानच्या भव्य रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद! ६५ नामांकित कंपन्यांचा सहभाग; २,२३७ उमेदवारांची नोंदणी, ४३७ युवकांची जागेवरच निवड

August 31, 2026

३० ऑगस्टला रोह्यात भव्य रोजगार मेळावा; २ हजारांहून अधिक तरुणांची नोंदणी, ५० हून अधिक कंपन्यांमध्ये म्हसकर यांच्या माध्यमातून ‘ऑन द स्पॉट’ नोकरीची संधी!

August 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us